आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 60 वर्षांपूर्वी असे दिसत होते सौदीचे हे शहर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ही छायाचित्रे सौदी अरेबियातील रियाध शहराची आहेत. आज गगनभेदी इमारतींनी सुसज्ज असलेले रियाध शहर एकेकाळी असे दिसत होते. 60 वर्षांपूर्वी सौदीत गेलेले अमेरिकन डॉक्टर डॅरेल क्रेन यांनी ही छायाचित्रे टिपली होती. यानंतर त्यांनी हे फोटोज वॉशिंगटन डीसीच्या सार्वजनिक लायब्रेरीला डोनेट केले होते. 
 

किंगच्या उपचारासाठी गेलेला डॉक्टर...
- अमेरिकन डॉक्टर क्रेन एप्रिल 1950 मध्ये रियाधला गेले होते. त्यांना किंग अब्दुल अजीज अल सौद यांच्या उपचारासाठी पाठवण्यात आले होते. 
- क्रेन यांना फोटोग्राफीचा छंद होता. कुठेही जाताना ते आपला कॅमेरा नेहमीच सोबत ठेवायचे. सौदीला गेले असतानाही त्यांनी हा छंद जोपासला. 
- कित्येक अहवालांमध्ये 1950 च्या दशकांच्या या छायाचित्रांना सौदीची पहिली रंगीत छायाचित्रे असेही म्हटले जाते. 
- या फोटोजमध्ये मातीची घरे, उंटावरून जाणारे स्थानिक आणि पर्यटक, तसेच फुटपाथवर लागलेली दुकाने दिसत आहेत. 
- क्रेन यांच्या काही फोटोजमध्ये यूएस ब्रिगेडियर जनरल वॉलेस एच ग्रॅहम सुद्धा दिसून आले. ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रूमन यांचे फिजीकल ट्रेनर होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 60 वर्षांपूर्वी असे दिसत होते रियाध...
बातम्या आणखी आहेत...