मेक्सिको सिटी- हे फोटोज मेक्सिकोतील सेक्स वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले रिटायरमेंट होम याचे आहेत. येथे प्रॉस्टिट्यूशन सोडलेल्या प्रौढ महिला राहतात. फ्रेंच फोटोग्राफर बेनेडिक्टने त्यांचे फोटोज
आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. त्याने आपल्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून सुमारे दशकभर फॉर्मर सेक्स वर्कर्स यांचे जीवन जवळून पाहिले आहे.
300 पेक्षा जास्त वर्कर्सचा मुक्काम आहे सध्या...
- बेनेडिक्टने आपल्या आठ वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या फॉर्मर सेक्स वर्कर्सचे फोटोज घेतले आहेत.
- 2008 ते 2016 या दरम्यान हे घेतलेले फोटोज 'लास अमोरोसास मास ब्रावास' नावाच्या एका बुकमध्ये पब्लिश झाले आहेत. ज्याचे लेखक सेलिया गेमेज रामोस आहेत.
- मेक्सिकोतील माजी सेक्स वर्कर द्वारा बांधलेले हे रिटायरमेंट होम शहरातील सर्वात गरीब लोकांना आसरा देते.
- या महिलांनी आपली संपूर्ण अडल्ट लाईफ शहरातील रस्त्या-रस्त्यावर घालवली आहे.
- 18 व्या शतकातील ही विटांची बिल्डिंग कधी काळी बॉक्सिंग म्यूझियम होती. जी आता प्रौढ सेक्स वर्कर्सचे ठिकाण बनले आहे.
- ही घरे मेक्सिको सिटीतील सिटी सेंटरमध्ये आहेत जी खूपच लोकवस्तीचा व गर्दीचा भाग आहे.
- रामोस लिहतात की, हे वर्कर्स आयुष्यभर जागोजागी मोटेलमध्ये काम करत रस्त्यावर झोपलेले आता या परमनंट शेल्टरवर राहत आहेत.
- हे शेल्टर माजी सेक्स वर्कर कॅमरेन मुनोजच्या मागणीनंतर उघडले. कारण त्याआधी अनेक प्रॉस्टिट्यूट्स घाणेरड्या प्लॅस्टिक बॅग्सवर झोपायच्या.
- मुनोजने हे शेल्टर उघडण्यासाठी सरकारशी 20 वर्षे लढा दिला. अखेर 2006 मध्ये याला परवानगी व फंड मिळाला.
- यानंतर येथे प्रौढ सेक्स वर्कर राहायला येऊ लागल्या आता सुमारे 300 महिला येथे राहतात.
- आता याला पब्लिक डोनेशन, फिमेल आर्टिस्ट आणि आर्टिस्ट द्वारा चॅरिटीतून मिळालेल्या फंडावर चालवले जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...