आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Year Ender : 2015 च्या जगभरातील काही घटनांचा PHOTOS द्वारे मागोवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळच्या काठमंडूमध्ये आलेल्या भूकंपानंतर ढिगाऱ्यात दबलेल्या तरुणाचा मृतदेह. - Divya Marathi
नेपाळच्या काठमंडूमध्ये आलेल्या भूकंपानंतर ढिगाऱ्यात दबलेल्या तरुणाचा मृतदेह.
युरोपमध्ये शरणार्थी संकटापासून ते तिबलिसच्या झूमधून सुटलेल्या प्राण्यांचे फोटोज या वर्षभरात जगात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वर्णन करत आहेत. या वर्षाची सुरुवात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने झाली. तर वर्षाच्या अखेरीसदेखिल पॅरिसला एका मोठ्या हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यात 130 हून अधिक नागरिकांनी प्राण गमावले. ISIS ने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली. इराक आणि सिरियासह जगभरात ISIS च्या दहशतवादाला लोक बळी पडले. मात्र त्यांच्यावर अमेरिकेच्या नेतृत्वातील आघाडीच्या सैन्याचे हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये यावर्षी फ्रान्स रशिया आणि ब्रिटन हे देशही सहभागी झाले.

याठिकाणी वाढला संघर्ष
यमनमध्ये बऱ्याच दिवसांपासून संघर्ष वाढला आहे. हाउती बंडखोरांनी सरकारला सुरू केलेल्या विरोधामुळे देशात गृहयुद्धाला सुरुवात झाली. त्याचबरोबर पॅलिस्टिनी आणि इस्रायली नागरिकांमध्ये संघर्षही वर्षभर सुरू होता. येरूसलेम आणि वेस्ट बँकसह अनेक ठिकाणांवर एकापाठोपाठ एक हिंसक घटना होत राहिल्या. दुसरीकडे कर्जाब बुडालेल्या ग्रीसमध्येही आर्थिक संकटाने डोके वर काढले. तुर्कस्तानच्या तटावर सिरियातील शरणार्थी चिमुरडा आयलानचा मृतदेह भेटला आणि संपूर्ण जग सुन्न झाले. त्यानंतर हंगेरी, ग्रीस, तुर्कीसह जगभरातील विविध भागांतून शरणार्थिंच्या वेदनामयी प्रवासाचे चित्र समोर येऊ लागले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शरणार्थींच्या संकटावर चर्चा सुरू झाली.

ऐतिहासिक निवडणुका आणि निकाल
म्यानमारमध्ये 25 वर्षांनंतर ऐतिहासिक निवडणुका झाल्या. त्यात विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की यांच्या पक्षाने विजय मिळवला. तर ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा कंझरवेटिव्ह पक्षाने सत्ता मिळवली. तर कॅनडामध्ये कंझरवेटिव पार्टीला सत्तेपासून दूर करत लिबरल पक्षाने 10 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टीने ऐतिहासिक निर्णय देत समलैंगिकांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.

नैसर्गिक संकटे...
अनेक देशांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. त्यात नेपाळचा भूकंप ही या यावर्षीची सर्वात मोठी घटना ठरली. यात 9 हजार लोकांना प्राण गमवावे लागले. तर चीनमध्ये चान-होम वादळाने 19 लाख नागरिकांवर परिणाम झाला. सुमारे 6000 कोटींचे नुकसान झाले. अफगाणिस्तानात हिमवादळाने हैदोस घातला. त्यात 250 हून अधिक लोकांनी प्राण गमावले. पेरूमध्ये भूस्खलन आण िचलीमध्ये आलेल्या पुराने लोकांचे जगणे कठीण केले. जॉर्जियाच्या तिबलिसमध्ये आलेल्या भयावह पुरामुळे प्राणी झूमधून रस्त्यावर आले.

दुर्घटनांचे वर्ष
जगात यावर्षी इतरही अनेक दुर्घटना पाहायला मिळाल्या. मक्कामध्ये हज यात्रेपूर्वी आणि यात्रेदरम्यान दुर्घटना घडल्या. यात्रेपूर्वी ग्रँड मशिदीत झालेल्या क्रेन अपघातात सुमारे 100 हून अधिक लोकांचे प्राण गेले. तर यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 750 हून अधिक भाविक मृत्यूमुखी पडले. तसेच चीनच्या तियानजिनमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये 100 पेक्षा अधिक नागरिकांनी प्राण गमावले. त्याशिवाय अनेक विमान अपघातही झाले.
(divyamarathi.com वाचकांसाठी 2015 चे काही खास फोटो काही भागांमधून दाखवणार आहे. हे पार्ट - 1 चे फोटोज आहेत.)
पुढील स्लाइड्सवर PHOTOS द्वारे जाणून घ्या वर्षभरात जगात कुठे काय घडले...