आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुवेतमध्ये अडकलेल्या 1.7 लाख भारतीयांना असे वाचवले होते, पाहा ऑपरेशनचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आखाती युद्धाच्या दरम्यान अम्मान येथे एयर इंडियाच्या फ्लाईटमध्ये चढताना भारतीय.... - Divya Marathi
आखाती युद्धाच्या दरम्यान अम्मान येथे एयर इंडियाच्या फ्लाईटमध्ये चढताना भारतीय....
इंटरनॅशनल डेस्क- प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक मॅथ्युनी मॅथ्यूज यांचे कुवेतमध्ये निधन झाले. ८१ वर्षीय मॅथ्यू मूळ केरळचे रहिवासी होते. १९९० मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या १ लाख ७० हजार भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मॅथ्यू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्यावर बेतलेला एअरलिफ्ट हा चित्रपटही गाजला होता. 
 
अक्षयकुमारने मॅथ्यू यांची भूमिका साकारली होती. चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी ट्विट करून मॅथ्यू यांच्या निधनाची माहिती दिली. १९५६ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी कामाच्या शोधात ते कुवेतला गेले. टोयोटा कंपनीत टंकलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केले. १९८९ मध्ये या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना टोयोटा सनी या टोपणनावाने ओळखले जात होते. आखाती युद्धात आपले सर्वस्व गमावलेल्या भारतीयांना मॅथ्यू यांनी आधार देत एअरलिफ्ट करून सुरक्षित बाहेर काढले. नेमके हे ऑपरेशन कसे राबवण्यात आले. त्यासाठी किती परिश्रम करावे लागले, याची माहिती यानिमित्ताने आम्ही तुम्हाला देणार आहोत.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, असे राबवले 59 दिवसांचे हे सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन...
बातम्या आणखी आहेत...