आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास बसणार नाही! उत्तर कोरियातही आहेत श्रीमंत, जगतात अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरियाच्या गरिबांना सगळीकडे दाखवले जाते. यूएन आणि अमेरिकेच्या निर्बंधांमुळे गरीब झालेल्या या देशात काही धनाढ्य लोक देखील आहेत. जागतिक निर्बंधांमुळे गरीब आणि गरीब झाले. मात्र, येथील एलीट क्लासवर निर्बंधांचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. अॅम्यूजमेंट पार्क असो की रेस्टॉरंट किंवा एंटरटेनमेंट सर्वत्र आलीशन लाइफ हे लोक एन्जॉय करतात. महागड्या कार, मोबाइल आणि बंगले दाखवून हे लोक आपण किती धनाढ्य आहोत हे लोकांना दाखवतात. 
 
> उत्तर कोरियाचे तज्ञ डॉ लियोनिड पेट्रोव्ह यांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्था किम जोंग उनच्या राजवटीत दिवसेंदिवस सुधारत आहे. 
> उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंग एक विकसित महानगर म्हणून समोर येत आहे. एकेकाळी काळ्या खड्ड्यांचे शहर असलेले प्योंगयोंग आता आशियातील सिटी ऑफ लाइट्स बनले आहे. 
> प्योंगयांगमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधांसह महागडे मोबाइल, कार, फूड आणि मनोरंजनाची सर्व साधने उपलब्ध आहेत. 
> येथील शिक्षणावर पाश्चात्य भाषा आणि अभ्यासक्रमाचा समावेश नसला तरीही अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येत आहेत. 
> पेट्रोव्ह यांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील 10 टक्के जनता एलीट लाइफ जगत आहे. ते अत्याधुनिक कार, मोबाइल आणि उपकरणे वापरतात. तरीही सर्व काही शासनाच्या आदेशानुसारच केले जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे, अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्या उत्तर कोरियात आपले प्रॉडक्ट्स विकत नाहीत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशी लाइफ जगतात उत्तर कोरियाचे धनाढ्य...
बातम्या आणखी आहेत...