आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of The Raqqa City Of Syria Ruled By Islamic State

छायाचित्रांमधून पाहा ISISची राजधानी असलेल्या रक्कातील ऑंखो देखा हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्कामधील परेडमध्‍ये सहभागी इस्लामिक स्टेटची दहशतवादी. - Divya Marathi
रक्कामधील परेडमध्‍ये सहभागी इस्लामिक स्टेटची दहशतवादी.
इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) नियंत्रणाखालील सीरियन शहर रक्का प्रत्ये‍क दिवशी बातम्यांत झळकत असते. दहशतवादी संघटना या आयएसआयएसची राजधानी मानते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने नुकतेच या शहरातील अंतर्गत छायाचित्रे जारी केली आहेत.
पूर्वी होते सीरियन बंडखोरांचे नियंत्रण...
- 2011 मध्‍ये सुरु झालेल्या नागरी युध्‍दाची सुरुवातीच्या वेळी रक्कामध्‍ये काही विरोधी निदर्शने झाली. ती नंतर थांबली.
- वर्ष 2012 पर्यंत या शहरात सीरियन सरकारचे कायदा चालायचा.
- 2013 मध्‍ये बंडखोरांनी शहरावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता.
- शहराच्या बाहेर सैन्याचे हवाई हल्ले चालू राहिले. मात्र बंडखोरांचा घेरा फोडून काढण्‍यात यश मिळाले नाही.
अल-कायदाकडून इस्लामिक स्टेटने हिसकवले शहर
- अल कायदाशी संबंधित अल नुसरा फ्रंटने क्रीडा केंद्रात शरीया न्यायालय सुरु केले.
- देशात असद सरकारविरुध्‍द वाढत्या असंतोषामुळे अलेप्पो, होम्स, इदलिब आणि इतर ठिकाणींहून लोक येथे पोहोचू लागले.
- जानेवारी 2014 मध्‍ये आयएस दहशतवाद्यांनी रक्कावर पूर्ण नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली.
- आता ही दहशतवादी संघटना यास आपले मुख्‍यालय आणि राजधानी असल्याचे सांगते.
वैभवशाली इतिहास
- रक्काची स्थापना इसवी सन 335 मध्‍ये बेजेन्टाइन म्हणजे पूर्व रोमन साम्राज्यात झाली होती.
- तिचे नाव कॅलिनिकस असे होते. त्यावेळी हे शहर आर्थिक आणि सैनिकी केंद्र होते.
- इसवी सन 796 ते 809 पर्यंत हारुन अल राशिदच्या शासन काळात रक्का राजधानीचे शहर होते. त्यावेळी हे शहर सांस्कृतिक केंद्र बनले होते.
- इसवी सन 1260 मध्‍ये मंगोलांच्या आक्रमणामुळे पूर्ण शहर उद्ध्‍वस्त झाले. हजारोंच्या संख्‍येने नागरिकांनी स्थलांतर केले होते.
- 1380 या वर्षी शहर पुन्हा उभे राहिले. त्यास सीरियातील सहावे सर्वात मोठे शहर मानले जात होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, इस्लामिक स्टेटच्या शासन काळात रक्काची स्थिती कशी आहे...