आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8000 मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या नराधमाला या गावात म्हणतात नायक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बोस्नियाचा माजी लष्करी कमांडर रातको म्लादिक युद्ध गुन्हेगारी संदर्भात आपल्या शिक्षेची प्रतीक्षा करत आहे. या नराधमावर 8000 मुस्लिमांच्या नरसंहाराचे आरोप आहेत. त्याचा फैसला पुढील आठवड्यात हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात सुनावला जाणार आहे. म्लादिक यूरोपचा एक हायप्रोफाइल वॉर क्राइमचा मुख्य आरोपी आहे. तरीही म्लादिकला आजही त्याच्या गावात एक नायक मानले जाते.

 

गावकऱ्यांना आहे ही भिती
> म्लादिक विरोधात अमानवीय गुन्हेगारी आणि नरसंहाराचे आरोप आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी हेग न्यायालयात सुरू आहे. 
> लष्करात असताना त्याने बोस्नियाचे रेब्रिनिका शहर काबिज केले. अख्ख्या शहरावर घेराव टाकून त्याने 8000 निष्पाप मुस्लिम पुरुष आणि मुलांचा नरसंहार करण्याचे आदेश दिले होते. 
> अमानुषपणाचा कळस गाठणाऱ्या या नराधमाने राजधानी साराजेव्हो येथे नागरिकांना एकत्रित करून त्यांच्या तोफा धडाडल्या होत्या. 
> 2011 मध्ये म्लादिकला अटक झाली. 1992 ते 1995 च्या काळात झालेल्या या युद्धात त्यावेळी सरकारने म्लादिकला विविध शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या युद्धात एकूण 1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता. 


काय म्हणतात गावकरी..?
> बोस्नियात म्लादिक याच्या गावाची लोकसंख्या दोन डझनाच्या जवळपास आहे. ते लोक म्लादिकला आजही एक नायक मानतात. त्याच गावात त्याचे नातेवाइक आजही राहतात. 
> याच गावात राहणाऱ्या जोरान म्लादिकने सांगितल्याप्रमाणे, ''रातको म्लादिकवर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्याने कुणाचाही नरसंहार केलेला नाही. तो खूप चांगला व्यक्ती आहे. जे काही घडले ते इतरांनी केले आहे.''
> गावातील प्रत्येक घरात आणि दुकानात म्लादिकचे फोटो टांगण्यात आले आहेत. या गावातील प्रत्येक जण म्लादिकचे तोंडभर कौतुक करतो.
> दुसऱ्या एका गावकऱ्याने दावा केला, की युद्धात शेजारच्या शहरात मुस्लिम समुदायाचे हजारो लोक एकत्रित आले होते. म्लादिक आणि त्याच्या सैनिकांनी त्यांना शहर सोडून जाण्याचा इशारा देखील दिला होता. 
> तो पुढे म्हणाला, त्या शहरात मी अनेकदा जाऊन आलो. तेथे आजही काही मुस्लिम राहतात. त्यांच्यासोबत मी काम केलेले आहे. त्यांना आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, म्लादिकच्या गावातील Inside PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...