आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरिबांच्या देशातील हुकूमशहा राहतो आलिशान महलात, Inside Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरारे - हे फोटो आहेत गरीब देश असलेल्या झिम्बॉब्वेच्या अध्यक्षाच्या आलिशान महलाचे. गरीब देशाच्या या श्रीमंत अध्यक्षाची एकूण संपत्ती आहे 6489 कोटी रुपये एवढी. लष्कराच्या कारवाईनंतर रॉबर्ट मुगाबे यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचा आलिशान बंगला चर्चेत आला होता. वेबसाईट झिम्बॉब्वियनने नुकतेच त्यांच्या बंगल्याचे फोटो प्रकाशित केले आहे.

 

64 कोटी रुपयांचा आहे हा बंगला...

- राजधानी हरारेमध्ये असलेल्या या बंगल्याचे निकनेम ब्लू रूफ असे आहे. या बंगल्याचे बांधकाम एका सर्बियन कंपनीने 2003 साली केले होते. 
- 25 बेडरूम असलेले हे खासगी चीनी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. याच्या छतावर शांघाईवरून आयात केलेल्या टाईल्स बसविण्यात आल्या आहेत.
- 44 एकर जागेत 64 कोटी रुपयांच्या बंगल्यात दोन धबधबेही आहेत. 

 

देशाच्या पैशानी उभारती संपत्ती
- 93 वर्षाचे डिक्टेटरने 37 वर्षाच्या कारकीर्दीत ही संपत्ती उभी केली आहे. यादरम्यान देशात हजारोंच्या संख्येने नागरिक मारले गेले. 
- स्थानिक माध्यमांनुसार, त्यांच्या संपत्तीमध्ये देशाची संपत्ती असलेल्या हिऱ्यांचाही समावेश आहे. 
- मुगाबे यांच्यावर जमीन आणि देशाची संपत्तीद लुटल्याचा आरोप झालेले आहेत.

 

पुढील स्लाईडवर पाहा - ब्लू रुफ या आलिशान बंगल्याचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...