आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांच्या चिमुरड्यांकडून करून घेतली जातेय ड्रग तस्करी, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गल्फ कार्टलच्या सदस्यांचे फोटो. - Divya Marathi
गल्फ कार्टलच्या सदस्यांचे फोटो.
मेक्सिकोचे हे फोटो येथील कुख्यात ड्रग तस्कर गल्फ कार्टलच्या सदस्यांचे आहेत. कार्टलच्या या सदस्यांनी मास्क न परिधान करता फोटो जारी करून त्यांना कशाचीही भीती नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या ग्रुपमधील बहुतांश सदस्य हे अत्यंत कमी वयाचे आहेत. त्यापैकी अनेकांचे वय तर अवघे 12 वर्ष आहे. मॅक्सिकन ब्लॉग 'एल ब्लॉग डेल नार्को वर हे फोटो जारी करण्यात आले आहेत. कार्टलच्या सदस्यांनी ते पाठवल्याचे सांगितले जात आहे.

या फोटोंमध्ये अत्यंत कमी वयाची मुले हातात गन. क्रॅक पाइप्स (ड्रग्ज सेवन करण्यासाठी वापरले जाणारे) आणि ड्रग्ससह दिसत आहेत. विशेष म्हणजे फोटोतील काही जणांनी बुलेटप्रूफ जॅकेटही परिधान केलेले आहे. गल्फ कार्टल मेक्सिकोच्या सर्वात जुन्या कार्टलपैकी एक आहे. या कार्टलचे अमेरिका, युरोप, पश्चिम आफ्रिका, एशिया, सेंट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मार्गे होणाऱ्या तस्करीच्या व्यापारावर वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षात काही विरोधी गटांनी त्यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ड्रग इनफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते अशाप्रकारे ग्रुपच्या सदस्यांनी मास्कशिवाय समोर येणे हे इतर कार्टल्समध्ये आपला धाक निर्माण करणे आणि लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. गल्फ कार्टलच्या सदस्यांनी सुरू केलेल्या जेलिस्को आणि लॉस जेटास सारख्या नव्या ड्रग कार्टलच्या येण्याने जुन्या ग्रुप्ससमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ड्रग कार्टलने जारी केलेले Photos
बातम्या आणखी आहेत...