आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे ड्रग्स माफियांना घातल्या जाताहेत खुलेआम गोळ्या, मृतदेहाचे लागलेत ढीग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या डेड बॉडीला मिठीत घेतलेली 26 वर्षाची जेनेलिन ओलेयर्स... - Divya Marathi
पतीच्या डेड बॉडीला मिठीत घेतलेली 26 वर्षाची जेनेलिन ओलेयर्स...
मनिला- फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो दुर्तेते यांनी ड्रग्ज व ड्रग्ज माफियाच्या विरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. अशा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे कौतूक केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात रोड्रिगो यांनी फिलीपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत 9000 हून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकले आहे. अनेक लोकांनी दावा केला आहे की, ड्रग्ज माफियाच्या मर्डरसाठी सरकारकडून आणखी 100 डॉलर बक्षिस म्हणून दिले जाते. सध्या फिलीपाईन्समध्ये रोजच्या रोज ड्रग्स डीलर्सचे मृतदेह रस्त्या-रस्त्यावर व गल्ली गल्लीत दिसत आहेत. आता तेथे स्थिती अशी आहे की, शवागरात मृतदेहाचे ढिगच ढिग पडले आहेत आणि नातेवाईकांना मृतदेहही ओळखू येत नाहीत. एक लाख ड्रग्ज माफियांना मारण्याचे नियोजन.....
 
- रोड्रिगो यांनी निर्णय घेतला आहे की, ड्रग्स माफियांच्या विरोधात कडक कारवाई करावी.
- एवढेच नव्हे तर त्यांना दिसता क्षणीच गोळ्या मारण्याचे आदेश आहेत. 
- रोड्रिगो यांनी शपथ घेतली आहे की, वर्षाच्या आता देशातील ड्रग्सचे नामोनिशान मिटवून टाकेन. 
- आपल्या माहितीसाठी हे की, रोड्रिगो यांनी 30 जून, 2016 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतली आहेत.
 
मृतदेहावर रडताहेत लोक-
 
- फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की, ड्रग ट्रॅफिकर्सना कशा वाईट पद्धतीने मारले जात आहे. 
- त्यांची फॅमिलीज डेड बॉडीजजवळ रडत बसलेले दिसत आहे. अनेक मृतदेह बेवारस स्थितीत पडलेले दिसत आहेत. 
- या माफियाचे एन्काउंटर करण्यापूर्वी हात-पाय बांधले जात आहेत तर काहींचे तोंड चिकटटेपने चिटकवलेले असते.
 
घरात घुसून पोलिस मारताहेत गोळया-
 
- फिलीपाईन्स या देशात एवढे ड्रग स्मगलिंग वाढले आहे की, हा देशच यामुळे बदनाम झाला आहे.
- याचमुळे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो यांनी सत्तेत येताच ड्रग्ज माफियाविरोधात लढाई सुरु केली आहे.
- त्यांनी पोलिसांनी ड्रग माफियांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. 
- एवढेच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही ड्रग्ज माफियांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
- राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रोड्रिगो यांनी पहिले वक्तव्य केले होते की, ‘ड्रगमुळे आपला देश मागे गेला आहे. आता हे थांबवायला हवे व मी कोणत्याही स्थितीत हे बंद करणार. यासाठी मला कोणतेही किंमत मोजावी लागली तरी ती मोजायला तयार आहे.
- सामान्य लोकांत ड्रग्जचे जाळे तोडत असल्याबाबत समाधान आहे पण माफियांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याच्या आदेशाबाबत त्यांच्यावर टीकाही होत आहे.
- देशातील शेवटचा एक ड्रग माफिया आणि फायनान्सर पकडले जात नाहीत तोपर्यंत ही लढाई सुरुच राहील. 
- सुमारे 70 हजार ड्रग माफिया आतापर्यंत सरकारसमोर शरण आले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फिलीपाईन्समधील ड्रग माफियाच्या विरोधात सुरु असलेल्या ऑपरेशनचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...