आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराण : महिलांना हवी आधुनिक Lifestyle, पाहा नाण्याची दुसरी बाजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणमध्ये असलेल्या दहशतीच्या वातावरणाच्या किंवा त्याठिकाणी असलेल्या कडक कायद्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. पण इराणचा एक वेगळा चेहरा गेल्या काही दिवसांमध्ये समोर यायाला सुरुवात झाली आहे. तो म्हणजे येथील नागरिकांची विशेतःच तरुणांची आणि त्यातही महिलांची बदलणारी लाईफस्टाइल.

फोटोग्राफर थॉमस क्रिस्टोफोलेटी या फोटोग्राफरने फोटोंच्या माध्यमातून इराणमध्ये होणाऱ्या या बदलाची माहिती दिली आहे. इराणमध्ये मॉल संस्कृती रुजायला लागली आहे. शॉपींगची आवडही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यातही महिला शॉपिंगमध्ये आघाडीवर दिसतात. सौंदर्य प्रसाधनांची खरेदी करण्याकडे त्यांचा ओढा असतो. इराणमध्ये असलेल्या निर्बंधांचा विचार करता हे बंडखोरीचे काम समजले जाऊ शकते. पण तरीही त्याचा फारसा विचार न करता त्यांची खरेदी सुरुच आहे.

इराणमधील पारंपरिक बाजार सुरुच आहेत. ते आजही लोकांचे खरेदीसाठीचे आवडते ठिकाण आहे. पण या मॉलसंस्कृतीमुळे त्यांना मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. काही तज्ज्ञांनी तर इराण ही आगामी काळातील एक महत्त्वाची अर्थव्यवस्था असेल असे भाकितही वर्तवले आहे. कदाचित ही त्याचीच सुरुवात असावी.
चला तर मग, इराणच्या या बदलत्या संस्कृतीचे चित्र पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर....