आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिचाई यांंच्याकडून अभिनंदनाबद्दल कृतज्ञता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - गुगल या आघाडीच्या कंपनीत सर्वोच्चपदी निवड झाल्यानंतर सुंदर पिचाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सर्व माध्यमांतून त्यांच्या निवडीचे स्वागत व कौतुक झाले. मित्रपरिवार, सहकारी, अनेक अनोळखी व्यक्तींनीही माझे अभिनंदन केले. मी या कौतुकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, असे पिचाई म्हणाले. त्यांनी आपली कृतज्ञता ट्विटरवरून व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी प्रमुख सत्या नाडेला यांनी पिचाई यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन केले. आयआयटी खरगपूरचा माजी विद्यार्थी आज गुगलच्या मुख्य कार्यकारीपदी असल्याने भारतातूनही अभिनंदनाचा वर्षाव झाला. मोदींची भेट घेण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.