आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pictures Of Giraffe Calf Born In South Africa News In Marathi

गेम पार्कमध्ये जिराफच्या मादीची प्रसुती, पर्यटकांनी कॅमेरात टिपला दुर्मिळ क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: जिराफच्या मादीच्या गर्भातून बाहेर येणारे पिलू)

पोर्ट एलिजाबेथ- दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिजाबेथ येथील गेम रिझर्व्हमध्ये जिराफच्या एका मादीला प्रसुत वेदना सुरु झाल्या आणि काही मिनिटात मादीची प्रसुती झाली. मादीने 1.8 मीटर उंच लांबीच्या पिलाला जन्म दिला. गेम पार्कमध्ये उपस्थित अनेक पर्यटकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेरात टिपला.
पोर्ट एलिजाबेथ येथील क्रागा कम्मा गेम पार्कमध्ये जिराफच्या मादीची प्रसुतीची प्रक्रिया जवळपास 15 मिनिटे चालली. सगळ्यात आधी मादीच्या गर्भाशयातून पिलाचे पाय, नंतर डोके आणि धड बाहेर आले. पिलू पूर्ण बाहेर आल्यानंतर मादीने त्याला चाटले. दूध पाजले.

पार्कचे को-ऑनर आयशा कॅंटर यांनी सांगितले की, आम्ही पिलांचे अद्याप लिंग परीक्षण केले नाही. तसेच अजून त्याचे नाव ठेवायचे बाकी आहे. परंतु हा दुर्मिळ क्षण असून तो अनेक पर्यक्षकांनी पाहिला. एवढेच नव्हे तर तो कॅमेरात कैद केला. दरम्यान, जिराफचा प्रसुतीचा काळ हा 16 महिन्यांचा असतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, जिराफच्या मादीचा प्रसुतीचा दुर्मिळ क्षण...