आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लठ्ठपणामुळे त्रस्त आहे नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा, हिंडण्या-फिरण्यास होतोय त्रास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयांग - नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या आजारी आहे. नुकतेच किम जोंग यांचे फोटो सोशल माध्यमांवर आले. या फोटोमध्ये किम जोंग लठ्ठ आणि थकलेले दिसताहेत. तब्बल दोन महिन्यापासून उत्तर कोरियाने कुठल्याही प्रकारचे क्षेपणास्त्र परिक्षण केलेले नाही. त्यामुळे या हुकूमशहाची तब्येत चांगली नसल्याची चर्चा आहे. त्यांचा शेवटचा फोटो कॉस्मेटिक प्रोडक्टच्या फॅक्ट्रीतून आले होते. याठिकाणी ते आपल्या पत्नीसह दिसले होते. फॅक्ट्रीत त्यांना सध्या फोल्डिंग चेअरची गरज भासतेय. 

 

मधुमेह आणि हायपरटेन्शनच्या त्रासाने ग्रस्त...
- मीडिया रिपोर्टनुसार, किम यांचे वजन पुन्हा वाढलेले आहे. त्यामुळे त्यांना हिंडण्यासही त्रास होतोय.
- लंडनच्या एका वृत्तपत्राने दावा केलाय की, यादरम्यान ते मधुमेह आणि हायपरटेन्शनने त्रस्त आहेत.
- रिपोर्टनुसार, मागील वर्षी वजन कमी करण्यासाठी किम यांनी जिमसाठी 19 कोटी रुपये खर्च केले होते.
- याव्यतरिक्त त्यांनी चीन आणि स्वित्झर्लंडमधून महागड्या दारुसह आलिशान वस्तू मागविल्या होत्या.

 

आजारामुळे थांबविले मिसाईल लाँचिंग
- नॉर्थ कोरियाने मागील महिन्यात बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी घेतली. मात्र याचे कामकाज दोन महिन्यापासून थांबलेले आहे. आजारामुळे या मिसाईलचे लाँचिंग लांबल्याची चर्चा आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - हुकूमशहा किम जोंग उन यांचे फोटो

बातम्या आणखी आहेत...