आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो मृत माश्‍यांमुळे नदीची झाली अशी अवस्‍था, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराग्‍वेमध्‍ये नदीतील हजारोच्‍या संख्‍येने पडलेले मृत मासे. - Divya Marathi
पराग्‍वेमध्‍ये नदीतील हजारोच्‍या संख्‍येने पडलेले मृत मासे.
इंटरनॅशनल डेस्‍क- वातावरण बदलाचा फटका आता पृथ्‍वीवरील जीवजंतूना बसू लागला आहे. याची साक्ष देणारी एक घटना नुकतीच उजेडात आली. पराग्‍वेमधील कन्‍फ्युसो नदीत हजारो मृत माश्‍यांचे फोटो समोर आले आहेत. हे फोटोज पेराग्‍वेची राजधानी असुनसियोपासून केवळ 30 किमीच्‍या अंतरावरुन काढण्‍यात आले आहेत. फोटोज समोर आल्‍यानंतर तेथील अधिकारी आता याचा तपास करत आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात माश्‍यांचा मृत्‍यू होण्‍याची ही पहिलीच घटना आहे. 
 
कशामुळे घडले असे? 
- एकाच ठिकाणी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्‍याने पराग्‍वे सरकारने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. 
- नदीजवळील कारखान्‍यांची सरकारने तपासणी सुरु केली आहे. कारखान्‍यांच्‍या वाढत्‍या प्रदुषणामुळे नदीचे पाणी प्रचंड खराब झाले असावे, असा अंदाज अधिका-यांनी वर्तविला आहे. 
- वैज्ञानिकांच्‍या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मरण्‍यामागे नदीतील सी-वीड हे रोपटेही कारणीभूत असू शकते. हे रोपटे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्‍याकडे खेचून घेते. त्‍यामुळे एकाच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता झाल्‍यामुळे माश्‍यांचा मृत्‍यू झाला असावा. 
- मागील वर्षीही कोस्‍टा रिका येथे स्‍वच्‍छ पाण्‍यात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले होते. वैज्ञानिकांनी ही गोष्‍ट पर्यावरणासाठी अत्‍यंत घातक असल्‍याचे म्‍हटले आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...