आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैमानिकाचा मृतदेह तुर्की स्वाधीन करणार, पंतप्रधान अहमत देवूतोग्लू यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा/लंडन/जेरूसलेम- तुर्कीने मंगळवारी सिरियाच्या हद्दीत पाडलेल्या रशियन विमानाच्या वैमानिकाचे प्रेत रशियाच्या सुपूर्द केले जाईल, अशी माहिती तुर्कीचे पंतप्रधान अहमत देवूतोग्लू यांनी रविवारी दिली आहे. दरम्यान, अंकारातील रशियाच्या दूतावासाने प्रेत ताब्यात घेण्याचा दिवस अद्याप निश्चित केलेला नाही.

देवूतोग्लू म्हणाले की, तुर्कीच्या जवानांनी रशियाचा वैमानिक ओलेग पेश्कोव्हचे प्रेत काल रात्री सीरियाच्या हद्दीतून आणले आहे. रशियाच्या धार्मिक परंपरानुसार त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही करण्यात आली आहे. सीरियाचे राष्ट्रपती असद यांच्याविरोधातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात पेश्कोव्हचे प्रेत सापडले होते. या प्रेतावर उभे राहून बंडखोर नाचत असल्याचा एक व्हिडिओ तेव्हा जारी झाला होता. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या वैमानिकास १२ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर वाचवले होते.
अल अदनानी निशाण्यावर : ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आपल्या लष्करास सीरियातील आयएसआयएसच्या अड्ड्यावर हवाई हल्ला करण्याचे आदेश देण्याच्या तयारीत आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, अायएसचा म्होरक्या शेख अबू मोहम्मद अल अदनानी हा कॅमेरून यांच्या हिटलिस्टवर आहे. अदनानी हा आंतरराष्ट्रीय हल्ला घडवून आणणाऱ्या युनिटचा म्होरक्या आहे. दरम्यान, जास्त नागरिक मारले जाऊ नये यासाठी ब्रिम्सटन क्षेपणास्त्रांचा वापर करावा, असा सल्ला अमेरिकेने ब्रिटनला दिला आहे. शियाचे एक विमान रविवारी इस्रायलच्या हद्दीत घुसले.

सिरियात हवाई हल्ला १८ नागरिक ठार, ४० जखमी
रविवारी सीरियाच्या इदलिब या उत्तर पश्चिम भागात रशियाने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १८ नागरिक ठार तर ४० जखमी झाले. या भागावर अल नुसरा या दहशतवादी संघटनेचा ताबा आहे.