आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रशियात एअर शोमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियात एक एअर शो सुरु असताना मिलिटरी हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले. दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
एअर शोमध्ये स्टंट करीत असताना बर्कुटी एअरोबॅटिक टीमचे एक हेलिकॉप्टर एका बाजूला झुकले. जरा वेळात खाली येऊ लागले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला. स्टंट करीत असताना इमरजन्सी अलर्ट सिस्टिम खराब झाल्याने हा अपघात झाल्याचे बचावलेल्या वैमानिकाने सांगितले आहे.
हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण हेलिकॉप्टरचे एवढे नुकसान झाले आहे, की पुन्हा दुरुस्त करता येणार नाही.
पुढील स्लाईडवर बघा, या दुर्घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...