आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pilot Invites Ex Porn Star In Cockpit And Begged To See Her Breasts

पूर्वाश्रमीच्या पोर्न स्टारला पायलटने बसवले कॉकपिटमध्ये, समोर आले PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लोने पोस्ट केलेला फोटो. - Divya Marathi
क्लोने पोस्ट केलेला फोटो.
न्यूयॉर्क - हिर्थोहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या कुवेत एअरवेजच्या फ्लाइटमध्ये पायलटने प्लेबॉय मोडेलला कॉकपिटमध्ये बोलावल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 वर्षीय मॉडेल क्लो माफियाने स्वतःच हा दावा केला आहे.
क्लोने दिलेल्या माहितीनुसार, स्वतः 'नॉटी पायलट' म्हणवणाऱ्या कॅप्टनच्या उपस्थितीत तिने विमानाच्या कंट्रोल सिस्टमबरोबरही छेडछाड केली होती. मॉडेलने घेतलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानाच्या सुरक्षेबाबत नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रवाशाला कॉकपिटमध्ये प्रवेशास मनाई केली आहे.

विमानात होते 300 हून अधिक प्रवासी
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या मॉडेलचे खरे नाव क्लो खान आहे. तिने सांगितले की, 300 प्रवाशांना घेऊन 33,000 फूट उंचीवर विमान उडवणाऱ्या या पायलटच्या वर्तनामुळे तिला धक्काच बसला. डेली स्टार नावाच्या एका इंग्रजी बेवसाईटशी बोलताना तिने सांगितले की, टेकऑफच्या काही वेळानंतरच तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बसण्यासाठी बोलावले.

कॉकपिटमध्ये स्मोकींग, शॅम्पेनही प्यायले
क्लोने सांगितले की, जेव्हा तिने कॉकपिटमध्ये प्रवाशांना बसवणे आणि स्मोकींगबाबत विचारले तेव्हा पायलटने सांगितले की, तो त्याचे नियम स्वतः तयार करतो. क्लो आणि तिच्या मैत्रिणीने कॉकपिटमध्ये जवळपास 40 सिगारेट ओढल्या. पायलटने त्यांच्याशी अश्लिल चर्चाही केली. तसेच कॉकपिटचा दरवाजा लॉक करत त्यांना शॅम्पेनही पाजले. क्लोने सांगितले की, त्याने या दोघींशी अश्लिल वर्तन केले. तसेच आम्हाला पायलटची कॅफ परिधान करण्याची आणि विमान उडवण्याची परवानगीही दिली. पायलटने सांगितले त्यानुसार मी कंट्रोल सिस्टमचे एक बटन दाबले. पण ते कशाचे होते ते मला माहिती नव्हते. पण त्यामुळे विमान ऑटोमॅटिक मोडवर गेल्याचे त्याने सांगितले. तो या दोघींना सेक्सी म्हणून बोलत होता. पायलटने सुमारे तासभर गाणी ऐकवत त्यांचे मनोरंजन केल्याचेही क्लोने सांगितले.

कोण आहे क्लो खान ?
प्लेब्वॉय मॉडेल असलेली क्लो खान वेबकॅमसमोर स्ट्रिपिंग करून पैसे कमावते. सध्या ती 'स्पियरमिंट रायनो' चा अब्जाधीश सीईओ जॉन ग्रे (58) याच्याबरोबर डेटींग करत आहे. क्लो आणि जॉन कैलिफोर्नियाच्या न्यूपोर्ट बीचवर एका बंगल्यात राहतात. ड्रग्ज सेवन आणि प्रॉस्टिट्यूशनमुले तिला 2010 मध्ये यूके एक्स फॅक्टरमध्ये प्रवेश मिळाला नव्हता.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...