आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये पायलटने केले तरुणीला प्रपोज, असा होता नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - प्रेमात असलेला प्रत्येक जण काही तरी वेगळे करून आपल्या पार्टनरला स्पेशल असल्याचा फीलिंग करून देण्यासाठी धडपड करत असतो. तेच क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. सध्या अशाच एका कपलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दुबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तरुणीला लग्नाचा प्रस्ताव देताना चक्क विमानाचा पायलट गुडघ्यांवर बसला. हा फोटो जॉर्डनच्या रॉयल जॉर्डेनिया फ्लाइटचा आहे.

> रॉयल जॉर्डेनियाची एक फ्लाइट अम्मानहून दुबईच्या दिशेने जात होती. याच फ्लाइटमध्ये वैमानिक अबु मनेह याची गर्लफ्रेंड देखील प्रवास करत होती. 
> अबु कुठल्याही परिस्थिती ही संधी गमवण्यासाठी तयार नव्हता. तो वेडिंग रिंग घेऊन अचानक आपल्या गर्लफ्रेंडकडे पोहोचला आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले. 
> इतका मोठा सरप्राइझ मिळाल्यानंतर गर्लफ्रेंड नकार देऊच शकली नाही. तिने लगेच होकार देत अबुला आलिंगण दिले. 
> अबुने सांगितल्याप्रमाणे, तो पायलट झाला तेव्हापासून आतापर्यंतची ही सर्वात स्पेशल फ्लाइट होती. यात त्याची गर्लफ्रेंड प्रवास करत होती आणि तो तिला प्रपोज करू शकला. 
> फ्लाइटच्या क्रू मेंबर्सने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. तसेच रॉयल जॉर्डेनियन एयरलाइन्सने हे फोटोज सोशल मीडियावर शेयर केले जे आता व्हायरल होत आहेत. 
 
पुढील स्लाइड्वर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...