आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१९ पर्यंत भारतात अखंडित वीज : गोयल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - चिरंतन आणि क्लीन एनर्जी स्रोतांतून भारतात २०१९ पर्यंत २४ तास अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी येथे सांगितले. भारत-अमेरिका ऊर्जामंत्र्यांच्या २१ रोजी आयोजित बैठकीत गोयल बोलत होते.

गोयल यांनी भारतीय शिष्टमंडळाचे, तर डॉ. एर्नेस्ट मोनिझ यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. २०२२ पर्यंत भारतात अपारंपरिक ऊर्जेद्वारे १७५ गीगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. यासाठी आगामी सात वर्षांत १५० अब्ज डॉलरची गुंतवणूक आवश्यक आहे. सरकारच्या १०० स्मार्ट शहरांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात वीजनिर्मिती आणि अपारंपरिक ऊर्जा, सक्षम ऊर्जा तंत्रज्ञान, सर्वंकष कचरा व्यवस्थापन प्रकल्प अादींची माहिती गोयल यांनी या वेळी दिली. भारताची ऊर्जेतील गरज अमेरिकेकडे असणारा ऊर्जा स्रोत आणि तंत्रज्ञानामुळे दोन्ही देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रात पूरक वातावरण आहे. गोयल यांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांचे स्वागत केले. पार्टनरशिप टू अॅडव्हान्स क्लीन एनर्जी- रिसर्च (पीएसीई-आर) यासारख्या संयुक्त संशोधन प्रकल्पाचेही सादरीकरण करण्यात आले.