आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: पिझ्झा ऑर्डरमुळे चार जणांचे प्राण वाचले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एवॉन पार्क (अमेरिका) - प्राण संकटात सापडल्यानंतर घाबरून न जाता शांत डोक्याने कसा निर्णय घेतला जावा, याचे प्रत्यक्ष उदाहरण समोर आले आहे. फ्लोरिडामधील एवॉन पार्कच्या हायलँड काउंटीमधील ही घटना आहे.

त्याचे झाले असे, साधारण २८ वर्षांची महिला शेरिल ट्रेडवे रोजच्या प्रमाणे सोमवारी आपल्या घरी काम करत होती. तिची तीन मुलेही घरीच होती. दुपारी दोनच्या सुमारास शेरिलचा जुना मित्र इथॉन निकरसन घराचा दरवाजा ढकलून आतमध्ये घुसला. शेरिलने त्यावर नाराजी दर्शवली. सुरुवातीस झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर नंतर मारहाणीत झाले. यानंतर तो इथॉन शेरिलच्या दोन मुलांना पकडून त्यांच्या गळ्याला चाकू लावतो. थोड्या वेळानंतर मुले भुकेने कासावीस होतात. त्यामुळे शेरिलने मुलांसाठी जेवण तयार करण्याचे कारण देत इथॉनला खोलीबाहेर पडू देण्याची विनवणी करते. त्याने काही न ऐकता आपल्या आयुष्यातील शेवटचा पिझ्झा माग आणि खा, असे तो सांगतो. इथॉन पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी शेरिलला मोबाइल देतो. यानंतर शेरिलने पिझ्झा कंपनीचे अॅप उघडले आणि पिझ्झा निवडीनंतर कॉमेंट सेक्शनमध्ये तिने प्लीज हेल्प, गेट ९११ टू मी, असा संदेश लिहिला. ९११ अमेरिकेतील हेल्पलाइन आहे, जसा भारतातील हेल्पलाइन क्रमांक १०० आहे. शेरिलने संदेश एवढ्या काळजीपूर्वक पद्धतीने लिहिला की, इथॉनला त्याचा थांगपत्ताही लागला नाही. पिझ्झा आऊटलेटकडून ८.३० वाजता पिझ्झा पोहोचला. पावती पाहिल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याला धक्काच बसला. २८ वर्षांच्या सेवेत मी पहिल्यांदाच असा प्रकार बघितल्याचे तो म्हणाला.
ग्राहकाच्या क्रमांकावर तिच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस पावणेचार वाजता तिच्या घरी पोहोचले. यानंतर २० मिनिटांत इथॉन पोलिसांना शरण आला.