आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल संघ घेऊन जाणाऱ्या विमानास अपघात, 76 मृत्युमुखी, 5बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोगोटा/ साआे पावोलो : दुर्घटनेची शंका आल्याने वैमानिकाने इंधन फेकून दिले, २२ पैकी १९ फुटबॉलपटूंचा मृत्यू ब्राझीलचा एक क्लब फुटबॉल संघासह ८१ जणांना घेऊन जाणाऱ्या चार्टर विमानाला मंगळवारी कोलंबियाच्या मेडलिनमध्ये अपघात झाला. त्यात ७६ जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने तीन फुटबॉलपटू, एक पत्रकार व एक कर्मचारी बचावले. घटनेत काही गंभीर जखमी झाले.
विमानाने बोलिव्हियाहून उड्डाण केले होते. हे विमान कोलंबियातील जोस मारिया कारडोव्हा विमानतळावर उतरणार होते. घटनेमागे इलेक्ट्रिक दोषाचे कारण सांगण्यात आले आहे. विमान पडण्याच्या अगोदर पायलटने त्याबद्दलची माहिती दिली होती. दुर्घटनेनंतर विमानाला आग लागली नाही. विमानाला पुढच्या भागातून वाचवण्यासाठी कदाचित इंधन टाकून दिले होते, अशी शक्यता आहे. विमानातून ७२ प्रवासी, ९ कर्मचारी प्रवास करत होते. ७२ प्रवाशांपैकी २२ चापेकोंसे रिअर फुटबॉल संघाचे सदस्य होते.

३३ हजार फूट उंचीवर.. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक मोरिको पटौदी म्हणाले, विमान ३३ हजार फूट उंचीवर पहाडावर धडकून पडले. दुर्घटना झालेले ठिकाण अतिशय दुर्गम असल्याने तेथे पोहोचण्यास सुरुवातीला अडचणी आल्या.

पहिल्यांदा अंतिम फेरीत
चापेकोंसे संघ दक्षिण अमेरिका क्लब अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. ही स्पर्धा कोलंबियात आयोजित करण्यात आली होती. ४३ वर्षांच्या इतिहासात ब्राझीलचा संघ प्रादेशिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहाेचण्याची ही पहिलीच वेळ होती. ब्राझीलचा अॅटलेटिको नेसियोनालशी होणार होता. सामना रद्द झाला.
ब्राझीलची कोणती टीम होती विमानात
- ब्राझीलची फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल टीम चापेकोएन्स कोलंबियाला निघाली होती. या टीममध्ये एकही स्टार प्लेयर नव्हता अशी माहिती आहे.
- 6 प्रवाशांना वाचवण्यात आल्याची माहिती आहे.
- विमानात चालक दलाचे ९ सदस्य होते.

पुढील स्लाइडवर पाहा...ब्राझीलच्या फुटबॉल टीमचा फोटो...
बातम्या आणखी आहेत...