आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लँडिंग करताना कोसळले विमान, दोन भारतीयांसह 62 जणांच्या चिंधड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमान दुर्घटनेत मारलेल्या गेलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन करताना रशिया आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे अधिकारी - Divya Marathi
विमान दुर्घटनेत मारलेल्या गेलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन करताना रशिया आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे अधिकारी
दुबई - फ्लाय दुबई एअरलाइन्सचे प्रवासी विमान शनिवारी सकाळी रशियाच्या रोस्तोव्ह-ऑन-डॉन येथे कोसळले. या दुर्घटनेत दोन भारतीय आणि क्रु मेंबर्ससह 62 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचे नाव अंजू अयप्पन आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 3.50 वाजता खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली. पायलटने दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र रनवे पासून 100 मीटर दूर अंतरावर विमानाचा मागचा भाग जमीनीला लागला. त्यानंतर विमान कोसळून मोठा स्फोट झाला.
दोन तास आकाशात घिरट्या घालत होते विमान
- विमान रात्री 1.30 वाजता रोस्तोव्ह मध्ये पोहोचले होते. मात्र खराब हवामानामुळे ते दोन तास आकाशात घिरट्या घालत होते.
- दोन तास घिरट्या घातल्यानंतर पायलटने एका अयशस्वी प्रयत्नानंतर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला.
- मात्र दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी रनवे पासून 100 मीटर दूर अंतरावर बोइंग 737-800 चा मागचा भाग जमीनीला लागला आणि विमानाने पेट घेतला. तेव्हा विमान एका आगीच्या गोळ्यासारखे झाले होते.
- रोस्तोव्ह विमानतळाला 20 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहे. येथे येणारे सर्व फ्लाइटस् कास्नोदार कडे वळविण्यात आले आहे.
- लो बजेट एअरलाइन्स फ्लाय दुबई 2009 मध्ये सुरु झाली असून प्रत्येक आठवड्यात 1700 फ्लाइट्स उड्डाण करतात.

कुठून येत होते विमान
- विमानाने दुबईहून उड्डाण केले होते. ते 1.20 वाजता (मॉस्को च्या वेळेनुसार) रोस्तोव ऑन डॉन येथे लँड होणार होते.
- मात्र पहाटे 3.50 वाजता ते क्रॅश झाले.

विमानात कोण-कोणत्या देशाचे प्रवासी होते
- एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनूसार, विमानात 44 रशियन्स, 8 युक्रेनचे, 2 भारतीय आणि उझबेकिस्तानचा एक प्रवाशी होता. यांच्याशिवाय 7 क्रु मेंबर्स विमानात होते.
- यात 33 महिला, 18 पुरुष आणि चार मुले होती. या सर्वांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विमान दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज.... बघा घटनास्थळाचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...