आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात लढाऊ विमान बाजारात कोसळले, २७ नागरिक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत- सिरियाच्या वायव्येला असणाऱ्या अरिहा शहरातील हवाई धुमश्चक्रीत सिरियाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला. विमान कोसळल्याने शहरातील नागरिक ठार झाल्याचे येथील आंदोलक गटांकडून सांगण्यात आले. दहशतवाद्यांना टिपण्यासाठी हवाई गस्ती वाढवण्यात आल्या आहेत. त्यादरम्यानच झालेल्या चकमकीत हे लढाऊ विमान नेमके भरबाजारात कोसळले. या विमानावर आंदोलकांनी गोळीबार केला होता वा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. यात २७ नागरिकांचा बळी गेल्याचे स्थानिक मानवाधिकार निरीक्षण विभागाने म्हटले आहे. मार्च २०११ पासून सुरू असलेल्या सिरियन गृहयुद्धात आतापर्यंत २ लाख २० हजार जणांचा बळी गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...