आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plane Crashes On Takeoff From South Sudan Airport

दक्षिण सुदानमध्‍ये टेकऑफनंतर कोसळले विमान, 41 प्रवासी ठार, दोघेच बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुबा - साउथ सूदानमध्‍ये एक विमान टेकऑफ केल्‍यानंतर काही वेळातच क्रॅश झाले आहे. राजधानी जुबामध्‍ये हा अपघात झाल्‍याची माहिती आहे. या घटनेत विमानातील 41 प्रवासी ठार झाले आहेत. स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार या अपघातातून केवळ दोन जण जिवंत राहिले आहेत. या विमानात किती प्रवासी होते ही माहिती अजुन समोर आली नाही, असे सुत्रांचे म्‍हणने आहे .
प्रत्‍यक्षदर्शींनी माहिती दिली
वृत्‍तसंस्‍था रॉयटर्सच्‍या माहितीनुसार, हा अपघात जुबा एयरपोर्टजवळ असलेल्‍या व्हाइट नील नदीच्‍या परिसरात झाला आहे. टेकऑफ केल्‍यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले अशी माहिती प्रत्‍यक्षदर्शींनी दिली आहे. या विमानाचे अवशेष नदीच्‍या परिसरात पडले आहेत. या अपघाताची काही फोटोही व्‍हायरल झाली आहेत.
कार्गो प्लेनमधुन एक मुलगाच जिवंत
घटनास्थळावर उपस्‍थित असलेल्‍या एका पोलिसाने माहिती दिली की, या अपघातात आतापर्यंत केवळ दाेघे जिवंत असल्‍याची माहिती आहे. त्‍यापैकी एक मुलगा आहे. लोकल मीडिया साउथ सूडान ट्रिब्यूनने सांगितले की, हे कार्गो प्लेन होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, असे कोसळले विमान..