आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली : धावपट्टीवरून विमानाची घसरगुंडी, बॅरियर्सही तोडले, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्गमो (इटली)- पॅरिसमध्ये उड्डाणासाठी सज्ज एका कार्गो विमानाची धावपट्टीवरून अचानक घसरगुंडी झाल्याचे पाहायला मिळाले. हे विमान घसरल्यानंतर वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला असलेले बॅरियर्स तोडून ते या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या समोर येऊन उभे राहिले. ही घटना इटलीच्या बर्गामो विमानतळाजवळ घडली. एका कुरियर कंपनीने हे विमान भाड्याने घेतले होते. खराब हवामानामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक मीडियाचे म्हणणे आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. विमानातील तिन्ही कर्मचारी सुरक्षित आहेत. घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आले होते.
>बर्गामो विमानतळ इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात वर्दळीचे विमानतळ आहे.
>३.७ किलोमीटर क्षेत्रफळातील विमानतळाला स्थानिक नागरिक आेरियो अल सेरियो नावाने आेळखतात
>गेल्या वर्षी विमानतळावर १ कोटी प्रवाशांचे आगमन झाले होते.
पुढे पाहा दुर्घटनेचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...