आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक पुलाच्या १२५ व्या स्मृतीनिमित्त ब्रिटनमध्ये प्लास्टिक नोटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहेत. क्लिडेस्डेल बँकेकडून पाच पाैंडाच्या वीस लाख प्लास्टिक नोटा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिकच्या नोटा कागदी नोटांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि अधिक टिकाऊ असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. सध्या बँक ऑफ इंग्लंड प्लास्टिक नोटांना चलनात आणण्याची तयारी करत असतानाच क्लिडेस्डेल बँकेने एक वर्ष आधीच अशा नोटा चलनात आणण्याचे ठरवले आहे. नवीन नोटेवर स्कॉटलँडच्या प्रसिद्ध फॉर्थ पुलाचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. पुलाच्या १२५ व्या वर्धापनाच्या निमित्ताने प्लास्टिक नोटा बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंड अशा प्रकारच्या नोटा पुढील वर्षी जारी करणार आहे.

अभियंत्याची प्रतिमा
ऐतिहासिक पुलासह स्कॉटलँडमधील अनेक इमारतींची निर्मिती करणारे स्कॉटलँडचे अभियंते सर विल्यम एरॉल यांची प्रतिमाही प्लास्टिक नोटेवर पाहायला मिळेल.

पॉलिमरचा वापर
अतिशय लवचिक प्रकारातील प्लास्टिक अर्थात पॉलिमरपासून नोटांची निर्मिती करण्यात आली आहे. सुंदर नक्षीसह आकर्षक रंगसंगतीचा वापर हेदेखील या नोटेचे वैशिष्ट्य सांगता येतील.

वैशिष्ट्ये
प्लास्टिकची नवीन नोट चलनातील नोटेच्या तुलनेत आकाराने
लहान आहे; परंतु रोकड स्वरूपात यंत्रात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.