आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी ट्रॅपमध्‍ये अडकली आहे ही एकेकाळची प्लेबॉय मॉडल, एकाची घेतली होती सुपारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळची प्लेबॉय मॉडल व मिस बोस्निया राहिलेली स्लोबोडान्का टोसिकला इंटरपोल पो‍लीस शोधत आहेत. - Divya Marathi
एकेकाळची प्लेबॉय मॉडल व मिस बोस्निया राहिलेली स्लोबोडान्का टोसिकला इंटरपोल पो‍लीस शोधत आहेत.
इंटरनॅशनल डेस्क - एकेकाळची प्लेबॉय मॉडल व मिस बोस्निया राहिलेली स्लोबोडान्का टोसिकला इंटरपोल पो‍लीस शोधत आहेत. मंगळवारी न्यायालयाने तिला फरार घोषित केले आहे. वास्तविक एका तस्‍कराला हनी ट्रॅपमध्‍ये अडकवून मारण्‍याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जुलै 2016 मध्‍ये न्यायालयाने तिला अडीच महिन्यांची शिक्षा सुनावली. मात्र ती न्यायालयात हजर झाली नाही. आता न्यायालयाच्या विनंतीवर इंटरपोलने तिच्या विरोधात अटक वॉरन्ट जारी केले आहे. असे मारायचे होते गँगस्टरला...
- हे प्रकरण 2006 मधील आहे. बोस्नियात दोन माफियांमध्‍ये दजोर्दजे जद्राले आणि डोरको एलेज एकमेंकांचे शत्रू होते.
- स्लोबोडान्काने डोरकोच्या सांगण्‍यावरुन जद्रालेला हनी ट्रॅपमध्‍ये फसवले व एका ठिकाणी भेटायला बोलवले.
- येथे दोघांची भेट होणार होती. मात्र डोरकोचे लोक येथे आली व जद्रालेवर गोळ्या झाडल्या सुरुवात केली.
- जद्रालेने अचानक झालेल्या या हल्ल्यात कसेतरी स्वत:ला वाचवले. पण तो गंभीर जखमी झाला.
माफीया गँगची सदस्य होती ही मॉडल
- स्लोबोडान्का जेव्हा 19 वर्षांची होती तेव्हा तिने मिस बोस्नियाचे किताब जिंकला होता.
- यानंतर 2008 मध्‍ये सर्बियन प्लेबॉय मासिकाने तिला आपल्या मुखपृष्‍ठावर स्थान दिले.
- पोलिसांच्या माहितीनुसार, ही मॉडल डोरको एलेजच्या गँगची खास सदस्य होती.
- या खटल्याचा गुंता शोधण्‍यासाठी इतके वर्ष का लागले, या प्रश्‍नाचे उत्तर पोलीस देऊ शकले नाही.
- मात्र ही मॉडल पळून गेल्याने इंटरपोलकडे हा खटला सुपुर्द करण्‍यात आला आहे.
- पोलीस म्हणाले, की तिला दुस-याकडे शोधण्‍यापूर्वी या तरुणीला बोस्नियात शोधले जाईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा कशी ही एकेकाळची मॉडल...