कॅलिफोर्निया - पोर्तुगाल आणि स्पॅनिश क्लब रियल माद्रीदकडून खेळणारा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या वादात अडकला आहे. अॅडल्ट मॅगझीन प्लेबॉयच्या एका मॉडलने रोनाल्डोवर आरोप लावला आहे. गर्लफ्रेंडबरोबर रिलेशनशीपमध्ये असूनही रोनाल्डोने आपल्या शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. रोनाल्डो नुकताच त्याची सुपरमॉडेल गर्लफ्रेंड इरीना शायकपासून वेगळा झाला आहे, त्याच वेळी हा आरोप करण्यात आला आहे. रोनाल्डोवर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. ब्राझिलीयन मॉडेल अँड्रेसा उर्चनेही त्याच्याबरोबर संबंध असल्याचे म्हटले होते.
डॅनियेला शावेज नावाच्या या मॉडेलने मेक्सिकन न्यूजपेपर रिफॉर्माला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, रोनाल्डो सुरुवातीला भलताच लाजाळू होता. पण नंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. मला माझे स्वप्न पूर्ण करायचे होते. मला त्याचे शरीर खूप आवडत होते, मी त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले. रोनाल्डोलाही मी आवडले असे तिने सांगितले. हे सर्व गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत घडल्याचे ती मॉडेल म्हणाली. त्यावेळी रोनाल्डो गर्लफ्रेंड इरीना शायकबरोबर रिलेशनमध्ये होता. रोनाल्डोवर आरोप करणारी मॉडेल यापूर्वीही वादात होती. सोशल मिडियावर हॉट फोटो आणि तिच्या बिनधास्त प्रतिक्रियांची चर्चा असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आरोप करणारी मॉडेल डॅनियेला शावेजचे फोटो...