आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने काढले प्लॉट विक्रीला, तेही सूर्यावरचे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - प्लॉट विकणे आहे... अशा जाहिराती आपण पाहिल्या असतील. पण स्पेनमधील मारिया ड्यूरन हिने साक्षात सूर्यही झाकोळेल असा उपद्व्याप केला आहे. मारियाबाई चक्क दोन वर्षांपासून सूर्यावरचे प्लॉट विकत आहेत. ई-कॉमर्स साइट ईबेवरून तिने ८६ हजारांची कमाईही केली. मात्र, ईबेने तिच्यासोबतचा करार मोडला आहे. यामुळे संतप्त मारियाने कंपनीला कोर्टात खेचले. कोर्टानेही तिची याचिका स्वीकारली. पुढील महिन्यात त्यावर सुनावणी होईल.
प्रकरण २०१०चे आहे. अमेरिकेच्या डेनिस होपने चंद्र, मंगळ व शुक्र ग्रहावर आपली मालकी दाखवून टॉम क्रुझ व जॉर्ज बुश यांनाही प्लाॅट विकून कोट्यवधी कमावले. डेनिसनकडून एफ विल्यम्स या व्यक्तीने हक्क विकत घेऊन प्लॉटची पुन्हा विक्री केली. चार वर्षांत १८ काेटी कमावले, , अशी बातमी मारियाने वाचली. हे पाहून तिनेही सूर्यावर आपला हक्क दर्शवला. नोटरीकडून प्रमाणपत्रे बनवली. तिने १९६७ मधील "यूएन आऊटर स्पेस ट्रीटी' या कराराचा फायदा उचलला. त्यानुसार अंतराळात कोणतेही राष्ट्र आपल्या सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही. करारात कोणत्याही वैयक्तिक अधिकारांचा उल्लेख मात्र नाही. याच त्रुटीचा फायदा डेनिस व मारियाने उचलला. मारियाने २०१३ मध्ये ईबेवर जाहिरातींतून सूर्यावर प्लॉट विक्री सुरू केली. एक युरो (७२ रुपये) चौरस मीटर दर ठेवला. सूर्य सर्वांच्या कामी येत असल्याने स्पेनकडून चार्ज वसूल करण्याची योजनाही तिने आखली. मारियाने म्हणते, यातून होणाऱ्या कमाईचा निम्मा वाटा सरकारला दिला जाईल. उरलेल्यांत २०% सरकारी पेन्शन फंड, १०% संशोधन, १०% गरिबांना व १०% वाटा स्वत: साठी ठेवला.मात्र, स्पर्श करून पाहता येईल अशाच वस्तू विकत असल्याचे सांगत ईबेने तिचे वेबपेज बंद केले. कोर्टाने तिचा अर्ज स्वीकारत म्हटले की, हे स्पॅनिश नागरिक व १४ कोटी ९६ लाख किमीवरील ग्रहाचे प्रकरण आहे. सुनावणी करावी लागेल. ईबेवर अमेरिकी गायक कान्ये वेस्टच्या शोची "हवा'ही विकली गेलेली आहे.

माझा दावा योग्य आहे. मी मूर्ख नाही. कायदा कळतो. कुणालाही बजावता आला असता ताे हक्क मी आधी बजावला. - मारिया (२०१०च्या दाव्यावर आजही ठाम)
{चंद्रावर प्रॉपर्टी विक्री प्रकरणी कॅनडाच्या एकाला तुरुंगवासही झाला आहे.
{करारातील देश शिक्षा देऊ शकतात. करारावर स्पेनचीही स्वाक्षरी आहे.