आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plus Sized Model Ashley Graham On Sports Illustrated Swimsuit Cover Page

फॅशनविश्‍वात या हेल्दी मॉडलची होतेय चर्चा, लठ्ठपणामुळे मिळत नव्हती संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत सध्‍या मॉडलिंग विश्‍वात अॅश्‍ले ग्रॅमची चर्चा आहे. फेब्रूवारीत ही हेल्दी मॉडल प्रसिध्‍द क्रीडा मासिक 'स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड' कव्हर पेजवर झळकळी आहे. यापूर्वी अॅश्‍ले इतकी बोल्ड कधी दिसली नव्हती. लठ्ठपणामुळे संधी मिळत नव्हती...
- नेब्रास्कामध्‍ये लहानाची मोठी झालेली अॅश्‍ले ग्रॅम प्लस साइज मॉडल आहे. स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड मासिकाच्या इतिहासात प्रथमच प्लस साइज मॉडलला कव्हरपेजवर स्थान मिळाले आहे.
- आपल्या सुरुवातीच्या दिवसांबाबत अॅश्‍लेने सांगितले, की एजेंट्सकडून सतत नकार मिळाल्याने खूप दु:ख होत असे.
- माझा एजंट म्हणाला, तू कधी मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणार नाही. कधी एडिटोरियल मॉडल होऊ शकणार नाही. जर तू वजन कमी केल्यास मिळू शकते संधी.
- शरीराने तंदूरुस्त आहे. कसेही असो आनंदी आहे. पुन्हा हळूहळू करिअरला कलाटणी मिळाली, असे अॅश्‍ले सांगितले.
- आज ती 29 वर्षांची असून आयुष्‍याकडे सकारात्मक दृष्‍टीकोन असल्याने तिला अनेक संधी मिळाल्या.
जगातील आघाडीच्या फॅशन मासिकांमध्‍ये मिळाली संधी
- अॅश्‍ले आतापर्यंत वोग, हार्पर बाजार, ग्लॅमर आणि लॅटिनसारख्‍या प्रसिध्‍द फॅशन मासिकात झळकली आहे.
- तिला अनेकदा प्लस साइज लॉन्जिरी मॉडल म्हणून लोकप्रियता मिळाली आहे. सध्‍या लिवाइज कॅम्पेनशी जोडली गेली आहे.
आईने आत्मविश्‍वास मिळवून दिला
- अॅश्‍ले आपल्या करिअरमधील योगदानासाठी आईचे आभार मानते. ती नेहमी तिला
आत्मविश्‍वास देत असते.
- आई नेहमी मला म्हणत असते, तू धाडसी, हुशार आणि सुंदर आहे.
सीनियर मॉडलच्या टिप्पणीला दिले सडेतोड उत्तर
- मासिकाच्या कव्हरपेजवर आल्यानंतर सीनियर मॉडल शेरिल टिएग्स म्हणाल्या, की अॅश्‍ले सुंदर आहे. मात्र 35 इंचापेक्षा जास्त कंबर ठेवणे धोकादायक आहे.
- त्या म्हणतात, की स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेडने हेल्दी मॉडलच्या कव्हरपेजवर आणून त्यांना सन्मान मिळवून दिला आहे.
- याला प्रत्युत्तर देताना अॅश्‍ले म्हणाली, याचा अर्थ इतर महिलांनी त्यांच्याप्रमाणे विचार करावा का? म्हणजे आम्ही हेल्दी मॉडल्संनी पेशा बदलावा का?
- मी तंदूरुस्त नाही आणि माझी साइज मोठी आहे, असे म्हणण्‍याचे कोणाला अधिकार नाही. असा मला फक्त माझा डॉक्टर सांगू शकतो.
- या प्रत्युत्तरानंतर शेरिल टिएग्स यांनी आपल्या टिप्पणीबद्दल क्षमा मागितली.
पुढील स्लाइड्सवर पाहा अॅश्‍लेची छायाचित्रे...