आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन EU मध्ये राहाणार की नाही, आज सार्वमत; 800 भारतीय कंपन्यांवर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय राहाणार आहे - Divya Marathi
भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय राहाणार आहे
ब्रिटन - ब्रिटन यूरोपियन यूनियनमध्ये (EU) राहाणार की नाही यासाठी आज सार्वमत घेतले जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी जनतेला अपील केले आहे, की त्यांनी EU मध्ये राहाण्यासाठी मतदान करावे. ते म्हणाले, 'जर आपण यूरोपियन यूनियनमधून बाहेर पडलो तर आपली अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते.' भारताच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय राहाणार आहे. ब्रिटनमध्ये 800 भारतीय कंपन्या आहेत. यूके यूईमधून बाहेर पडल्यास त्याचा परिणाम या कंपन्यावर पडू शकतो. यातून 1.1 लाख लोकांना रोजगार मिळत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम
1 - इन्व्हेस्टमेंट
- भारत हा यूकेचा तिसरा सर्वात मोठा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर आहे.
- ईयूमधून ब्रिटन बाहेर पडल्यास त्याचा थेट परिणाम भारतीय कंपन्यांच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवर होईल. कंपन्या येथून काढता पाय घेऊ शकतात.
- यूकेमध्ये नोकरदारांची कमतरता भासू शकते.

2 - ईयू मार्केटमध्ये एक्सपान्शन
- ईयू सदस्य देशांच्या सीमेवर कोणत्याही प्रकारचा कर लागत नसल्यामुळे येथे आधीपासून स्थापन झालेल्या भारतीय कंपन्या ओपन बिझनेस करतात.
- जर ब्रिटन ईयूमधून बाहेर पडला तर यूकेच्या कोणत्याही अडसराशिवाय संपूर्ण यूरोपात उद्योग ऑपरेट करण्यावर बंदी येईल.

3 - करन्सीवर परिणाम
- यामुळे भारताच्या उद्योगावर परिणाम होईल.
- यूरो-पौंड मधील घसरण रोखून धरलेल्या निर्यात व्यवसायात भारताला झटका बसू शकतो.
पुढील स्लाइडमध्ये, पंतप्रधान कॅमरुन यांचे उद्योगांवर लक्ष्य
बातम्या आणखी आहेत...