आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Give Assurance To Netaji's Grandson That He Will Look In Spying Case

निगराणीप्रकरणी लक्ष घालू, नेताजींच्या नातवास पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतण्याच्या मुलाने सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बोस यांच्या कुटुंबावर ठेवण्यात आलेल्या निगराणीचा अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सूर्यकुमार बोस असे त्यांचे नाव अाहे. पंतप्रधानाच्या जर्मनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री भारतीय राजदूत कार्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राजदूत विजय गोखले यांनी त्याचे आयोजन केले होते. समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांचे सरकार असताना नेताजींच्या कुटुंबावर पाळत ठेवली जात होती, ही बातमी वाचल्यानंतर मला तर धक्काच बसला. म्हणूनच निगराणीचा संपूर्ण अहवाल जनतेसमोर यायला हवा, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सत्य बाहेर यायला हवे, असे मला वाटते. एवढेच नव्हे, तर सरकारने गरज पडल्यास तपास आयोगाचीदेखील स्थापना करायला हवी. परंतु सरकारने स्वातंत्र्याबाबत खोट्या गोष्टींचा प्रचारही थांबवला पाहिजे.

आतापर्यंत अहिंसेचा नको तितका बोलबोला झाला. खरे तर सुभाषचंद्र बोस यांचे योगदान नाकारून स्वातंत्र्य मिळणे शक्यच नव्हते, असा दावा त्यांनी केला. सूर्यकुमार बोस हे इंडो-जर्मन असोसिएशन या हम्बर्ग येथील संघटनेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, भारतीय तरूणांनी चिनी तरूणांकडून नक्कीच शिकले पाहिजे. तसे झाल्यास देश वेगाने पुढे जाऊ शकेल. सध्या सिलीकॉन व्हॅलीत ७० टक्के भारतीय आहेत. परंतु गूगलचा जन्म भारतात होत नाही, याचे दु:ख वाटते.

भाषेवरून तडा नाही, धर्मनिरपेक्षता मजबूत
भाषेवरून तडे जातील, अशी भारतातील धर्मनिरपेक्षता नाही. ती मजबूत आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय विद्यालयात जर्मनीला संस्कृतसोबत तिसरी भाषा म्हणून मान्यता देण्याच्या वादावर मोदी बोलत होते. वास्तविक जर्मनीच्या रेडिआेवर ज्या वेळी संस्कृत भाषेतून बातमीपत्र दिले जात होते तेव्हा भारतात मात्र असे संस्कृत बातमीपत्र नव्हते. म्हणूनच धर्मनिरपेक्षतेला धक्के बसू शकत नाहीत.

क्लायमेट चेंज परिषदेच्या अगोदर अजेंडा तयार करू
जगभरात वातावरण बदल होत असताना कार्बन उत्सर्जनाठी भारताला दोषी ठरवणाऱ्या विकसित देशांना पंतप्रधान मोदी यांनी फटकारले आहे. भारताचे उत्सर्जनाचे दरडोई प्रमाण तुलनेने नगण्य आहे. तरीही देश जबाबदारीचे भान ठेवून क्लायमेट चेंज परिषदेच्या अगोदर आपली भूमिका आणि धोरण स्पष्ट करेल. जगभरातून आमच्याकडे बोट दाखवले जात आहे. हे पाहून मी तर चकित झालाे आहे. जग आम्हाला जाब विचारू शकत नाही. कारण उत्सर्जनाचे प्रमाण तुलनेने सर्वात कमी आहे. आमच्या संस्कृती-परंपरेत जागतिक पर्यावरणाच्या रक्षणाचे धडे आहेत. त्यामुळे कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असे त्यांनी बजावले. फ्रान्समध्ये सप्टेंबरमध्ये ही परिषद होणार आहे.