आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Addressing Indian Community Members In Tashkent

मोदी पोहोचले कझाकिस्तानमध्ये, पंतप्रधानांनी विमानतलावर केले स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को/ताश्कंद - पंतप्रधान नरेंद्र मोदी दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी कझाकिस्तानची राजधानी अस्तानाला पोहोचले. विमानतळावर कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मॅसीमोव्ह यांनी मोदींचे स्वागत केले. याठिकाणी पोहोचताच मोदींनी ट्विटद्वारे आनंद व्यक्त केला आहे. मध्य आशियामध्ये कझाकिस्तान आमचा विश्वासू मित्र आहे. स्वागतासाठी पंतप्रधान करीम मॅसीमोव्ह यांचे आभार, असे मोदींनी ट्विट केले. हा देश या परिसरातील भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक सहकारी असल्याचे मोदी म्हणाले. यापूर्वी 2011 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी याठिकाणचा दौरा केला होता.

अजेंडा काय ?
दोन्ही देशांदरम्यान दहशतवादाचा मुद्दा महत्त्वाचा असेल. गेल्या काही वर्षांत येथील 1500 तरुणांनी ISIS मध्ये प्रवेश केला आहे. युरेनियम आणि दहशतवादासंदर्भातील करारावर सर्वांची नजर असेल. मोदींच्या या दौऱ्यावर रशियाचीही नजर आहे. त्याचे कारण म्हणजे कझाकिस्तान आणि रशियाचे संबंधही चांगले आहेत.
त्याआधी, उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी भाषणाची सुरुवात उझबेकी भाषेत केली. दोन्ही देशांदरम्यान नाते दृढ होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, एखाद्या देशात त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेत बोलल्याने तेथील लोकांना कोणीतरी आपली व्यक्ती असल्याची जाणीव होते.
या जगात केवळ दोनच गोष्टी अशा आहेत ज्यांची जगभरात एकच भाषा आहे. त्या म्हणजे हसणे आणि रडणे. त्यांची भाषा कधीही वेगळी असू शकत नाही, असेही मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणासाठी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय समुदायाची भेट घेतल्यानंतर मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

उझबेकिस्तानमध्ये भारतीय भाषेचा प्रसार करण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी उझबेकी-हिंदी डिक्शनरीचे प्रकाशनही केले. याठिकाणी 6 संस्थांमध्ये भारतीय भाषांचे शिक्षण दिले जाते आणि प्रचारही केला जातो. विशेषतः याठिकाणी प्राथमिक ते पदव्युत्तर पर्यंतचे हिंदीचे शिक्षण दिले जाते. रेडिओवरही गेल्या 53 वर्षांपासून हिंदी भाषेत प्रसारण केले जाते. एवढेच नाही तर टिव्ही चॅनल्सवर रामायण आणि महाभारतचे प्रसारणही झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ताश्कंदमधील कार्यक्रमाचे काही PHOTOS