आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi And Nawaz Sharif Smiled To Each Other From Distance

US : समोरा-समोर बसले मोदी-शरीफ; लांबून अभिवादन, हसले पण बोलले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे नवाज शरीफ यांच्यात अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. न्यूयॉर्कमधय सोमवारी पीसकिपिंग समिटमध्ये हे दोनही नेते समोरासमोर बसले होते. दोघे एकमेकांबरोबर बोलले नसले तरी, इशाऱ्यामध्ये दोघांनी एकमेकांना हात दाखवून अभिवादन केले. एकदा नव्हे तर दोनदा. एकमेकांकडे पाहून हसलेही, पण बोलले नाही.

कॉन्फरन्स हॉलमध्ये काय घडले ?
संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मोदी आधी पोहोचले. काही वेळानंतर नवाज शरीफही त्याठिकाणी आले. परिषदेत दोन्ही नेते हॉर्सशू शेप्ड टेबलवर एकमेकांच्या समोरासमोर बसले होते. मोदींना पाहताच शरीफ यांनी हसून हात दाखवत अभिवादन केले. प्रत्युत्तरात मोदींनीही हसून प्रतिक्रिया दिला. काही सेकंदांनंतर मोदींनी शरीफ यांच्याकडे हसून हात दाखवला तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही तशीच प्रतिक्रिया दिली. परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतरित्या हे वृत्त फेटाळले आहे. तर संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी दोन्ही नेत्यांनी केवळ एकमेकांना हात दाखवून अभिवादन केल्याचे सांगितले.

एकमेकांच्या भाषणावर टाळ्या वाजवल्या
कॉन्फरन्स हॉलमध्ये हे दोन्ही नेते सुमारे दीड तास समोरासमोर बसले होते. दोघांनी एकमेकांच्या भाषणावर टाळ्याही वाजवल्या. भाषणानंतर मोदी लगेचच हॉलमधून निघून गेले. त्यानंतर 10-15 मिनिटांनी पाकिस्तानचे पंतप्रधानही गेले.

बान की मूनबरोबर बसले होते मोदी
कॉन्फ्ररन्स हॉलमध्ये मोदींच्या बाजुने यूएन सेक्रेटरी जनरल बान की मून, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि फ्रान्स तसेच इंडोनेशियाचे नेते बसलेले होते. तर शरीफ यांच्या बाजुने बराक ओबामा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह रवांडा आणि इथियोपियाचे नेते होते.

भेटीची शक्यता होती, कारण...
भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अखेरपर्यंत ही आशा बाळगली होती की दोन्ही नेते समोरा समोर असतील तर भेट नक्की होईल. पण तसे झाले नाही. मोदी आणि शरीफ न्यूयॉर्कच्या वॉल्डोर्फ अॅस्टोरिया हॉटेलमध्ये थांबलेले होते. पण ते समोरा समोर आलेच नाही. भारतीय अधिकाऱ्यांनी आधीच मोदी आणि-शरीफ यांच्यात प्रत्यक्ष भेट होण्याच्या सर्व शक्यता फेटाळल्या होत्या. पण दोन्ही नेत्यांमध्ये किमान हस्तांदोलन होईल अशी अपेक्षा होती. तर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनाही मोदी-नवाज भेटतील अशी अपेक्षा होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS