आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInUSA : मोदींचे मराठमोळे स्वागत, पटेल आंदोलन मागे, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. गुरुवारी सकाळी साडेचार वाजता त्यांचे विमान न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनडी एअरपोर्टवर उतरले. येथे मोदींची व्यवस्था The Waldorf Astoria हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याठिकाणी मोदींना पाहण्यासाठी त्यांचे समर्थक आणि चाहत्यांची गर्दी झाली होती. उपस्थितांनी मोदी-मोदीची घोषणाबाजी केली. तर एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार पटेल समाजाने मोदींच्या विरोधातील आंदोलन मागे घेतले आहे. याठिकाणी मोदींचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. नववारी परिधान करून आलेल्या महिला आणि चिमुकल्यांनी मोदींचे स्वागत केले. मराठमोळ्या पोशाखातील ढोल ताशांच्या पथकानेही मोदींचे स्वागत केले.

मोदींच्या स्वागतासाठी रॅली
वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पटेल समुदाय आता पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलन करणार नाही. तर त्याऐवजी मोदींच्या स्वागतासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी समर्थकांच्या मते चर्चेनंतर आता पटेल समुदायाने आंदोलन स्थगित करण्याची तयारी दाखवली आहे. यापूर्वी आलेल्या बातमीनुसार आरक्षणाच्या मागणीवरून मोदींच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले होते. ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पटेल म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. गुजराती कम्युनिटी आणि पटेल कम्युनिटीच्या प्रमुखांनाही बोलावण्यात आले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती दौऱ्याची माहिती
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांच्या अमेरिकेती दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. स्वरुप यांनी ट्विट केले की, मोदी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करणार नाहीत. ते संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी संबंधित सम्मेलनात बोलणार आहेत. मोदी अमेरिका दौऱ्यादरम्यान अनेक जागतिक नेते, मोठे गुंतवणूकदार आणि फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी यांची भेट घेणार आहेत. तसेच ते सिलिकॉन व्हॅलीलाही भेट देणार आहेत. रविवारी मोदी फेसबूक हेडक्वार्टर आणि गूगल कॅम्पसचा दौरा करतील. त्याशिवाय

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींच्या अमेरिका दौऱ्याशी संबंधित PHOTOS
व्हिडीओ पाहा दुसऱ्या स्लाइडवर...