आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-२० परिषद: दहशतवाद, वातावरणातील बदल मोदींच्या अजेंड्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंटल्या- जी-२० परिषदेला रविवारपासून तुर्कीमध्ये सुरुवात होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यासह दहशतवाद, वातावरण बदल आणि काळा पैसा इत्यादी मुद्दे पंतप्रधानांच्या अजेंड्यावर असतील. ही परिषद दोन दिवस चालणार आहे.

जगभरातील २० नेते परिषदेत सहभागी होणार आहेत. अनेक राष्ट्रांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अनेक अर्थव्यवस्था गडगडल्या आहेत. परिषदेला राष्ट्राध्यक्ष बराक ओेबामा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणे अपेक्षित आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोइस आेलांद यांनी पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला दौरा रद्द केला आहे.

नाणेनिधीची फेररचना
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोट्याची फेररचना करण्यात यावी, अशी मागणी अनेक जागतिक नेत्यांनी केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. चीननेदेखील कोट्याची फेररचनेची मागणी केली होती. त्यासाठी चीनला जी-२० मध्ये मतदानाचा हक्कदेखील हवा आहे.
काही द्विपक्षीय चर्चाही
ब्रिटनचा तीनदिवसीय दौरा आटोपल्यानंतर मोदी रात्री उशिरा तुर्कीत पोहोचतील. मोदी काही देशांसोबत द्विपक्षीय चर्चाही करण्याची शक्यता आहे. ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या नेत्यांशीदेखील पंतप्रधान चर्चा करतील.

>८५ टक्के जागतिक अर्थव्यवस्थेपैकी देशांचा जी-२० मध्ये समावेश.
> ७५ टक्के जागतिक व्यापार आणि दोन तृतीयांश लोकसंख्या.