आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Attacked By British Media Over Intolerance Issue

भारतात हिंदु तालिबान तर, मोदी विष्णूचा नवा अवतार, ब्रिटीश मिडियातून टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - तीन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश मिडियाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ब्रिटिश न्यूज वेबसाइट 'द गार्डियन'च्या एका आर्टिकलनुसार फ्रीडम ऑफ स्पीच संपल्याच्या आणि इनटॉलरन्स वाढल्याच्या मुद्यांवर मोदींची भूमिका अत्यंत गळचेपी आहे. ब्रिटनमध्ये याविषयी आवाज उठवणे गरजेचे आहे. हे आर्टिकल अनीश कपूर यांनी लिहिले आहे. ते मूळ मुंबईचे असून ब्रिटनचे प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. यापूर्वीही ते वादात अडकले आहेत. ब्रिटनमध्ये महाराणीची आक्षेपार्ह मूर्ती बनवल्याच्या विरोधात त्यांच्या प्रदर्शनाला विरोधही करण्यात आला होता.

मोदी गुरुवारी लंडनला जाणार आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांच्या उपस्थितीत मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर'ही दिला जाणार आहे. त्यानंतर मोदी आणि कॅमेरून यांनी 10-डाउनिंग स्ट्रीटमध्ये 90 मिनिटे चर्चा केले. त्यानंतर काही करारांवर सह्या केल्या.

आर्टिकलमध्ये म्हटले विष्णूचा नवा अवतार दिसतात
> गार्डियनच्या आर्टिकलमध्ये कपूर यांनी लिहिले की, 'हिंदुंचे देवता विष्णूचे अनेक अवतार होते. त्यातील बहुतांश अवतान मानवरुपात होते. नरेंद्र मोदीही त्यांचे नवे अवतार दिसतात. देशात हिंदुंचा दबदबा असल्याने अनेक भयावह सत्य लपलेले आहे.
> देशातील सोशल आणि रिलिजियस मायनॉरिटी (सुमारे 50 कोटी लोक) वर गंभीर धोका आहे. मोदी सरकार इनटॉलरन्स थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर या स्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही, तर त्याचे परिणाम वाईट होतील.
>भारतात हिंदु 'हिंदू तालिबान' वेगाने पसरत आहे. मोकळेपणाने बोलणाऱ्यावर येथे अत्याचार केले जातात. गेल्या महिन्यातच अनेक लेखकांनी इनटॉलरन्च्या विरोधात पुरस्कार परत केले आहेत.
>भारत 1.25 अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे. येथे 96.5 कोटी हिंदू आणि 17 कोटी मुस्लीम आहेत. आम्ही वर्षानुवर्षे अत्याचार सहन केला आहे. पण तरीही आम्ही एकतेचे एक उदाहरण प्रस्थापित केले. पण जर हिंदु कट्टरता अशीच पसरत राहिली तर हा देशासाठी धोका ठरेल.
>ब्रिटनमध्ये आम्ही तोंड बंद ठेवू शकत नाही. आम्हाला बोलायचा अधिकार आहे आणि ती आमजी जबाबदारीही आहे.
>डेव्हीड कॅमेरून यांनी मानवाधिकारांशी तडजोड करून कोणताही करार करू नये असे आम्हाला वाटते.
>मोदींनी भारतात लेखक लेखक, बुद्धिजिवी, पत्रकार आणि नागरिकांच्या विरोधात सुरू असलेल्या अत्याचारांबाबत स्पष्ट मत मांडावे असेही आम्हाला वाटते.