आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक तंटे शांततेने सोडवावेत, आसियान परिषदेत मोदी यांचे मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर- दक्षिण चिनी सागरातील संघर्षासारखे अनेक प्रादेशिक तंटे शांततामय मार्गाने सोडवण्यात यायला हवेत. त्याचबरोबर दहशतवादविरोधी कारवाईत सदस्य राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य वाढवले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान परिषदेकडून अपेक्षा व्यक्त केली.
सागरी सुरक्षा, पायरसी, मानवतेचे प्रश्न, नैसर्गिक आपत्तीमध्ये आसियानच्या दहा राष्ट्रांनी परस्पर सहकार्य वृद्धीसाठी विशिष्ट आराखडा निश्चित करण्याची वेळ आली आहे. त्यात दहशतवाद हे जगावरील सर्वांत मोठे संकट आहे. भारताने आसियानसाठी नेहमीच द्विपक्षीय सहकार्यावर भर दिला आहे. म्हणूनच आपण त्यात अधिक भर कशी पडेल, यावर विचार करण्याची गरज आहे. दक्षिण चिनी सागरातील संघर्ष शांततामय मार्गाने चर्चेतून सोडवला गेला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांचा वेग दुपटीने वाढवावा लागेल.

आेलांद प्रमुख पाहुणे
फ्रान्सचेराष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइस आेलांद पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे असतील. भारत किंवा फ्रान्सकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात त्यांना निमंत्रण दिले असून, आेलांद यांनी ते स्वीकारले आहे.
असल्याचे सूत्रांनी सांगितले. फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेंट फॅबिअस शुक्रवारी भारताच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली.

चिनी पंतप्रधानांशी चर्चा
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी त्यांचे चिनी समकक्ष ली किकियांग यांची भेट घेऊन चर्चा केली. उभय नेत्यांत द्विपक्षीय, जागतिक प्रश्न तसेच दोन्ही देशांना वाटणाऱ्या समस्यांचा ऊहापोह बैठकीतून करण्यात आला. चीन आणि भारत यांच्यात परस्पर विश्वास आणि सहकार्य वृद्धिंगत झाले असून त्यामुळे आशियात शांतता, विकास साधणे शक्य होऊ शकेल, अशी अाशा ली यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मोदी यांनी सौरऊर्जेच्या क्षेत्रात चीनला एकत्र येण्याचे निमंत्रणही या निमित्ताने दिले. सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी व्हावे.