आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगला मुक्तिसंग्राम: सर्व शहीद भारतीयांचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशमुक्तिसंग्रामातील शहीद सर्वच भारतीय सैनिकांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा राष्ट्रपती मोहंमद अब्दुल हमीद यांनी केली. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना मुक्तिसंग्रामाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करताना हमीद बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींच्या वतीने हा सन्मान स्वीकारल्यानंतर दोन्ही देशांचे नाते कुणाचाही दबाव आला तरी तुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

सीमाकरार ऐतिहासिक : भारत-बांगलादेशादरम्यानझालेला सीमा करार ऐतिहासिक असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या करारानुसार दोन्ही देश आपल्या भूभागाचे हस्तांतरण करतील. या करारामुळे दोन्ही देशांतील लोकांची मने जोडली जातील, असेही मोदी म्हणाले. आपण केवळ शेजारी नाहीत, परस्परांच्या कायम सोबतही आहोत हे आता जगाला मान्य करावे लागेल, असा दावा मोदींनी केला. कदाचित काही लोक तराजू घेऊन बसतील कोणत्या देशाने काय कमावले, काय गमावले याची गणिते मांडतील. मात्र, बांगला देशाची ही भूमी भारतीय जवानांनी जिवाची पर्वा करता मिळवली असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान मोदी यांच्या दोनदिवसीय बांगलादेश दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान एकूण १६२ वस्त्यांच्या अदलाबदल करण्याबाबत करार करण्यात आला असून व्यापार, उद्योगासह इतर अनेक क्षेत्रांत सहकार्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे.
सहानव्या प्रकल्पांचे अनावरण : पंतप्रधानमोदी यांनी बांगलादेशात भारताच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या सहा नव्या प्रकल्पांचे अनावरण केले. यात भारत-बांगला मैत्री महिला वसतिगृह, कुमुदिनी रुग्णालय, अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण साहित्याचा पुरवठा करण्यासंबंधी प्रकल्पांचा समावेश आहे.

तिस्तापाणी प्रश्न :मोदींनी तिस्ता जलवादाचाही उल्लेख केला. पाणी हा राजकीय वादाचा मुद्दा होऊच शकत नाही. यावर मानवतेच्या दृष्टीनेच विचार व्हायला हवा, असे मोदी म्हणाले. बांगला देशाचा सर्वांत विश्वासू मित्र म्हणून भारत जबाबदारी घ्यायला तयार आहे. यात अजून काही समस्या असल्या तरी परस्पर चर्चेतून त्या सोडवल्या जाऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
{जगातील प्रत्येक सहावा मनुष्य हिंदुस्थानी आहे. तरीही आज जगात शांततेवर चर्चा करण्याची संधी भारताला मिळत नाही.
{बनावट चलनी नोटांचे कारस्थान करणारे दुसरेच आहेत. मात्र, बांगलादेश विनाकारण बदनाम होतो.
{बांगलादेशाने क्रिकेट वस्त्रोद्योग क्षेत्रांत अल्पावधीत नाव कमावले आहे.
नमो ढाकेश्वरी...पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी येथील प्रसिद्ध श्री श्री ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला रविवारी भेट देऊन देवीची आरती केली.

जग बदलले, मात्र राष्ट्रसंघ तसाच...
संयुक्तराष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याबाबतचा मुद्दाही मोदींनी या दौऱ्यात उपस्थित केला. ते म्हणाले, "संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, यात स्थापनेनंतर काहीही बदल झालेला नाही. एकीकडे जग बदलत असताना राष्ट्रसंघ दहशतवाद निपटण्यासाठी ठोस उपाय सुचवू शकलेला नाही. गरीब देश आपसांतील सहकार्याने या दहशतवादाशी लढू शकतील. याचे कारण म्हणजे सार्क देशांची संस्कृती आणि अन्नपदार्थ एकसारखे आहेत.'

ढाकेश्वरी मंदिरात पूजन
तत्पूर्वीपंतप्रधान मोदी यांनी बांगला देशातील प्रसिद्ध ढाकेश्वरी देवीच्या मंदिरात दर्शन घेतले विधिवत पूजा केली. नंतर त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीतील सदस्यांशी चर्चा केली. गोपीबाग भागात असलेल्या प्रसिद्ध रामकृष्ण मिशन आश्रमालाही मोदींनी भेट दिली. तेथील लोकांशी चर्चा करून मोदींनी रामकृष्ण परमहंस यांना वंदन केले