आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#EastAsiaSummit: मोदी म्हणाले, संपूर्ण जगच दहशतवादाच्या छायेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसाच्या मलेशिया दौ-यावर आहेत. मोदी 13 व्या आशियन-इंडिया परिषदेत सहभागी होण्यासाठी आले होते. मोदींनी रविवारी 10 व्या ईस्ट एशिया समेटमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, जग दहशतवादाच्या छायेत आहे. दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडणे योग्य ठरणार नाही. मात्र, कोणत्याही देशाने दहशतावादाला खतपाणी घालू नये. या ग्लोबल चॅलेंजमधून सुटका करून घेण्यासाठी सारं जग आमच्याकडे आशेने पाहत आहे. आपले भविष्य चांगले करण्यासाठी ईस्ट एशिया समेट चांगला पर्याय आहे. यावेळी मोदी आशियन कम्युनिटी डेक्लेरेशन सायनिंग सेरेमनीत ईस्ट एशिया देशांच्या नेत्यांसमवेत दिसून आले. काही तासातच मोदी क्वालालंपूरमधील भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. नेहमीप्रमाणे ते तेथे प्रभावी भाषण करतील. आपल्याला माहित असेलच की मलेशियात 20 लाखांहून अधिक भारतीय राहतात.
आता भारताचा नंबर -मोदी
आता भारताची वेळ आली असल्याचे आम्हाला माहिती आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. आम्ही टेक-ऑफ करण्यास तयार आहोत. बदलाच्या या नव्या युगाचा अनुभव घेण्यासाठी मी तुम्हाला (गुंतवणूकदार) भारतात येण्याचे आमंत्रण देतो. अनेक जागतिक एजन्सींनी भारताला आकर्षक गुंतवणुकीचा देश म्हणून गुणांकन दिले आहे. आयएमएफ जागतिक बँकेने चांगल्या विकासाची आशा व्यक्त केली. इतर देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे मत "इकॉनॉमिस्ट' मासिकाने व्यक्त केले आहे.
आसियान बिझनेस संमेलन सुधारणांचा दुसरा टप्पा
विकासकरण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती मोदी यांनी दिली. विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही धोरणात्मक आणि अार्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा सुरू केला असल्याचे मोदी यांनी या वेळी सांगितले. आम्ही अर्थव्यवस्थेला आणखी मोकळीक देण्याचा प्रयत्न करत आहोत. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ करण्यात आली आहे. आवश्यक नसलेल्या खर्चाला कात्री लावण्यात आली आहे. जलवायू परिवर्तनावर प्रतिबद्धता दाखवण्यासाठी इंधनावर आम्ही कार्बन कर लावला असल्याची माहिती त्यांनी गुंतवणूकदारांना दिली.

क्वालालंपूरमध्ये आयोजित आसियान बिझनेस तथा गुंतवणूक शिखर संमेलनात इतर देशांच्या प्रमुखांशी हात मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित गुंतवणूकदारांना अभिवादन केले.
आज काय काय करणार मोदी?
- क्वालांलपुरमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांत भाषण ठोकणार
- मोदी रामकृष्ण आश्रमात जातील. याशिवाय तेथे स्वामी विवेकानंदच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
पुढे वाचा, मोदी आणखी काय म्हणाले...