आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने भारताला परत केल्या १० कोटी डॉलरच्या २०० कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतातून चोरी गेलेल्या २०० हून अधिक कलाकृती मंगळवारी अमेरिकेने भारताला परत केल्या. त्यांची एकूण किंमत १० कोटी डॉलर असून त्यातील काही कलाकृती २००० वर्षे जुन्या आहेत. हा सांस्कृतिक वारसा द्विपक्षीय संबंधांची वीण अधिक भक्कम करणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.

चोरी गेलेल्या कलाकृती भारताला परत करण्यासाठी ब्लेअर हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्वसाधारणपणे जगातील देशांतील संबंधात नेहमी भेटवस्तू असतात. या भेटवस्तू मोठी भूमिका बजावतात. मात्र, अनेकदा सांस्कृतिक वारसा दोन देशांच्या संबंधात महत्त्वाचा ठरतो. मागील दोन वर्षांत विविध देशांनी भारतातून चोरी गेलेला सांस्कृतिक वारसा परत करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्या देशांची सरकारे आणि त्यांची प्रवर्तन संचालनालये सांस्कृतिक कलाकृतींची तस्करी रोखण्यासाठी सजगच नाहीत तर त्या मूळ ठिकाणी पाठवण्याचेही काम करत आहेत. आम्हाला आमच्या मूल्यांशी जोडणारा अमूल्य सांस्कृतिक खजिना परत केल्याबद्दल मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे विशेष आभारही मानले.

अमेरिकेने परत केलेल्या कलाकृतींमध्ये चोल काळातील (इसवी सनपूर्व ८५० ते इसवी सनपूर्व १२५०) हिंदू कवी संत माणिक्काविचावकर यांच्या एका मूर्तीचाही समावेश आहे. चेन्नईच्या सिवान मंदिरातून ही मूर्ती चोरीस गेली होती. तिची किंमत १५ लाख डॉलर आहे. शिवाय भगवान गणेशाची १ हजार वर्षे जुनी कांस्याची मूर्तीही आहे. अमेरिकेमध्ये २००७ मध्ये हाती घेण्यात आलेल्या ऑपरेशन हिडन आयडलमध्ये यातील बहुतांश कलाकृती जप्त करण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी आर्ट ऑफ द पास्ट गॅलरीचा मालक सुभाष कपूरला अटक करण्यात आली.
ब्लेअर हाऊसमध्‍ये सोपवण्‍यात आल्‍या मूर्ती..
- ब्लेअर हाऊस घेण्‍यात आलेल्‍या एका कार्यक्रमात मोदींकडे प्राचीन मूर्ती सोपवण्‍यात आल्‍या.
- अमेरिकेने 200 हून अधिक मूर्ती भारताला परत केल्‍या आहेत.
- या मूर्ती चोरी होऊन विदेशात विकल्‍या गेल्‍या होत्‍या;
यावर मोदी काय म्‍हणाले...
अमेरिकेकडून मूर्ती मिळवल्‍यानंतर पंतप्रधान मोदी म्‍हणाले, ''काही लोकांसाठी मूर्ती म्‍हणजे पैशाची बाब असेल. मात्र, अमेरिकेसाठी या मूर्ती अमुल्‍य आहेत. या मूर्ती म्‍हणजे आपला सांस्‍कृतिक वारसा आहे.'' यापैकी देवी-देवतांच्‍या काही मूर्ती या कास्‍याच्‍या, टेरा-कोटाच्‍या आहेत. या संग्रहात अशाही काही मूर्ती आहेत ज्‍या, 2000 वर्षाहून अधिक जुन्‍या आहेत.
मोदींच्‍या दौ-यातील हायलाइट्स...
03:54 AM: मोदींनी वॉशिंग्‍टनच्‍या ब्लेअर हाऊसमध्‍ये अमेरिकी थिंक टँक्सच्‍या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
03:44 AM: मोदी म्‍हणाले - " हा असा खजिना आहे ज्‍याचा आनंद पूर्ण जग घेऊ शकते; या संग्रहात अत्‍यंत प्राचीन मूर्ती आहेत."
03:54 AM: पीएम म्‍हणाजे- " यूएस सरकारचे मी आभार मानतो, ज्‍यांनी भारताचा वारसा जोपासून ठेवला. यामुळे भारतील लोकांमध्‍येही आपल्‍या प्रती सन्‍मानाची भावना निर्माण होईल."
03:26 AM: मोदी म्‍हणाले - "आम्‍ही ओबामा यांचेही आभारी आहोत. ज्‍यांनी भारताचा सांस्‍कृतिक वारसा असलेल्‍या मूर्ती आम्‍हाला परत केल्‍या."
03:14 AM: यूएस अटॉर्नी जनरलसोबत भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व असलेल्‍या मूर्ती परत करण्‍याचा कार्यक्रम सुरू.
02:36 AM: मोदी अर्लिंगटन सेमेट्रीला पोहोचले. येथे स्पेस शटल कोलंबिया मेमोरियलच्‍या कार्यक्रमात सहभागी झाले. कल्‍पना चावला यांच्‍या कुटूंबियांची त्‍यांनी भेट घेतली.
2:17 AM: मोदींनी ट्वीट करुन सांगितले की, कतारमधून 23 कैद्यांची सुटका करण्‍यात आली असून, लवकरच ते भारतात परतणार आहेत.
12:30 AM: मोदी अमेरिकेत पोहोचले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...