आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी सोशल नेटवर्किंग साइटवर मोदी, भारतातून मिळाले प्रचंड हिट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात चीन दौ-यावर जात आहेत. या दौ-याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी चीनमधील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट ‘वेइबो’वर अकाऊंट ओपन करून चिनी भाषेत संदेश पोस्ट केला. ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच भारतातून या वेबसाईटला प्रचंड हिटस् मिळत असून ‘वेइबो’ नेमके आहे काय, याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. मुळात वेईबो या शब्दाचा अर्थ मायक्रोब्लॉगिंग असा आहे.

वेईबोवर प्रसिद्ध होणा-या मजकुराचे नियमन करणारी वेगळी यंत्रणा आहे. चीन सरकारच्या मदतीने हे नियमन केले जाते. चुकीचा किंवा आक्षेपार्ह मजकूर या साईटवरहून तत्काळ काढला जातो. विशेष म्हणजे इतर वेबसाईटच्या तुलनेत सरकारच्या विरोधात सर्वाधिक भावना लोक याच वेबसाईटवर व्यक्त करतात. आगामी काळात या वेबसाईटची इंग्रजी आवृत्ती सुरू होणार असून ही आवृत्ती सुरू झाल्यावर या साईटला मिळणारा प्रतिसाद प्रचंड वाढू शकतो. सप्टेंबर २०१३ मध्ये व्हनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी चीन दौ-यावर रवाना होण्यापूर्वी वेईबोवर अकाऊंट ओपन केले होते.

याशिवाय ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांच्यासह जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांची या वेबसाईटवर अकाऊंटस् आहेत.

>चीनमध्ये फेसबुक आणि टि्वटर या सोशल साईटस््वर बंदी असल्याने चिनी लोकांना मायक्रोब्लॉगिंगसाठी देशी साईटचा वापर करावा लागतो. ‘वेइबो’ प्रसिद्ध साईट आहे.
>या साईटचे मूळ नाव सिना वेईबो होते. मात्र, या साईटला टेन्सेट वेईबोसारख्या साईटचे कडवे आव्हान होते. यानंतर याचे नाव बदलून केवळ ‘वेइबो’ ठेवले.
>फेसबुक-ट्विटरचे मिक्चर : वेईबो हे फेसबुक आणि ट्विटरचे मिक्चर आहे. १४० कॅरेक्टरची मर्यादा असून फेसबुकसारखे फोटो आणि व्हीिडओ शेअर करता येतात. पोस्ट सर्वांनाच दिसते.
>युजर्ससाठी मेडल सिस्टीम : युजर्सना प्रोत्साहन देण्यासाठी वेईबोच्या वतीने मेडल सिस्टीम वापरली जाते. गेम खेळले किंवा इतर काही अॅक्टिव्हीटी केल्या तर मेडल प्रदान केले जाते. आपल्या मेडलसोबत इतरांना मिळालेली मेडल्सही युजर पाहू शकतो.

३० टक्के लोक चीनमध्ये वेईबोचा वापर करतात
२०० हून अधिक जागतिक नेत्यांनी गेल्या वर्षी अकाऊंट ओपन केले
३२ हजार फॉलोव्हर्स मोदींना काही वेळातच मिळाले