आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Praises Bhaskars No Negetive News Campaign

भास्करच्या नो निगेटिव्ह मंडेचे मोदींनी कॅनडात दिले उदाहरण, म्हणाले ही साधी गोष्ट नाही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरँटो - तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या टप्प्यात कॅनडात आहेत. गुरुवारी टोरँटोमध्ये एका कार्यक्रमात भारतीयांसमोर बोलताना त्यांनी दैनिक भास्करने चालवलेल्या "नो निगेटिव्ह मंडे' अिभयानाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, या अिभयानावरून देशाची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. भारतात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. ही साधी नव्हे, खूप महत्त्वाची बाब आहे.

मोदींच्याच शब्दांत...
तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक सरप्रायझिंग गोष्ट सांगतो. खरंच, हे सर्वांत मोठे सरप्राइज पाहा...मलाही आश्चर्य वाटले. सुखद धक्काच. एका वृत्तपत्राच्या मालकांनी मला पत्र पाठवले आहे. सांगा, आश्चर्य आहे की नाही? या पत्रात लिहिले आहे की, या देशाची सध्याची मानसिकता पाहता आमच्या वृत्तपत्राने एक धोरण ठरवले आहे. आठवड्यातून एकदा आम्ही फक्त सकारात्मक बातम्याच प्रसिद्ध करू. (उपस्थित १० हजार लोकांनी यावर टाळ्या वाजवून स्वागत केले.) ही साधी गोष्ट नाही. एका वृत्तपत्राने स्वत: पुढाकार घेऊन एक वेगळे अभियान चालवणे मोठी आणि सकारात्मक गोष्ट आहे. ही कल्पना काही मी मांडलेली नाही. आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम नेहमी म्हणत, सकारात्मक बातम्यांचा एक कॉलम असू द्या. याबाबत काही सांगण्याचे धारिष्ट्य मी कधी दाखवले नाही. काहीही असो, गेल्या काही दिवसांत देशातील बदललेल्या जनमानसाच्या भावनांचे प्रतिबिंब चांगले उमटत आहे. जे स्वप्न घेऊन आपण जगतो ते आपल्या डोळ्यांसमोर साकार होताना दिसेल, याचा मला विश्वास आहे.
नो निगेटिव्ह न्यूज...
दर सोमवारी "नाे निगेटिव्ह न्यूज'चे अिभयान सुरू करणारा दैनिक भास्कर हा देशातील एकमेव माध्यम समूह आहे. आम्हाला नव्या दिशेने विचार करण्याची व ती अमलात आणण्याची ही शक्ती विकासाची आस असलेल्या आमच्या लाखो वाचकांमुळे प्राप्त झाली आहे. त्यामुळे माध्यमांच्या पारंपरिक शैलीतून बाहेर पडत समाजहिताचा निर्णय आम्ही घेऊ शकलो. भारतासह जगभरातील माध्यम समूह आगामी काळात दैनिक भास्करचा आदर्श समोर ठेवून या दृष्टीने परिवर्तन घडवण्यासाठी पावले उचलतील, अशी आशा आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ...