आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंतींना सेतूमध्ये रूपांतरित केले : मोदी, दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हँक्युव्हर - माझा हा दौरा केवळ संस्मरणीय नव्हे तर ऐतिहासिकदेखील आहे. केवळ ४२ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान आल्यामुळे नाही तर भारत आणि कॅनडा यांच्यातील काळे ढग दूर झाले आहेत. आम्ही भिंतींना सेतूमध्ये रूपांतरित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तीन देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर मोदी शुक्रवारी मायदेशी रवाना झाले.

कॅनडाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी मोदी टोरंटोहून व्हँक्युव्हरमध्ये दाखल झाले. पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यासोबत गुरुद्वारा खालसा दिवानलाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन घेतले. ते ट्विट करून म्हटले, अतिशय समाधानाने कॅनडातून रवाना होत आहे. हा प्रवास भारत-कॅनडा संबंधांना आणखी बळकटी देईल. कॅनडाच्या नागरिकांचे खूप खूप आभार. एका अन्य ट्विटमध्ये म्हणाले, पंतप्रधान हार्पर यांचे विशेष धन्यवाद. अतिशय चांगले यजमान, शानदार माणूस आणि एक अतिशय जवळचा मित्र. दरम्यान पंतप्रधानांचे विमान फ्रँकफर्टमध्ये इंधन भरण्यासाठी उतरेल.

३ देश, ३ कामगि-या
१. फ्रान्सकडून ३६ रफाल विमानांच्या खरेदीचा सौदा. महाराष्ट्राच्या जैतापूरमध्ये बंद पडलेल्या आण्विक ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू होणार.
२. जर्मनीतून गुंतवणूक आणि व्यापार सुलभ करणारी व्यवस्था सुरू होणार. भारतात गुंतवणुकीसाठी सहमती.
३. कॅनडाकडून ३ हजार ७१५ टन युरेनियम पुरवठ्यावर सहमती. त्यासाठी सुमारे अडीचशे कोटी डॉलर्स अपेक्षित.

धर्म नव्हे, जीवनशैली
टोरंटोहून व्हँक्युव्हरमध्ये दाखल झालेले मोदी हार्पर यांच्यासमवेत थेट गुरुद्वा-यात पोहोचले. तेथे संवाद साधताना माेदी म्हणाले, कॅनडात नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थायिक शीख समुदायातील नागरिकांनी आपल्या कामातून भारताचा गौरव वाढवला आहे. त्यानंतर उभय नेते लक्ष्मीनारायण मंदिरात गेले. भारतात सुप्रीम कोर्टाने हिंदू धर्माची सुंदर व्याख्या केली आहे.

जुलैपासून मिळेल भारताला युरेनियम
आेट्टावा । आण्विक प्रकल्पासाठी कॅनडासोबत करार झाल्यामुळे आता कॅनडाची कॅमको कंपनी जुलैपासून भारताला युरेनियमचा पुरवठा करण्यास सुरुवात करेल. कझाकिस्तान, रशियानंतर भारताला युरेनियमचा पुरवठा करणारा कॅनडा हा तिसरा देश आहे. १९७० नंतर कॅनडाने भारताला युरेनियम आणि आण्विक हार्डवेअरचा पुरवठा करणे बंद केले होते.