आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Thanks Uzbek Counterpart For Warm Welcome

उझबेकीस्तानच्या राष्ट्रपतींना भेटले मोदी, अामीर खुसरोची कविती दिली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उझबेकिस्तानचे राष्ट्रपती इस्लाम कारिमोव्ह यांच्यासह मोदी. - Divya Marathi
उझबेकिस्तानचे राष्ट्रपती इस्लाम कारिमोव्ह यांच्यासह मोदी.
मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी उझबेकीस्तानच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी 13व्या शतकातील प्रमुख कवींपैकी एक असलेल्या अामीर खुसरो यांची 'खम्स-ई-खुसरो' (Khamsa-i-Khusrau) ही कविता भेट म्हणून दिली. त्यापूर्वी मोदींना राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या 'कुकसारो' (Kuksaroy) ममध्ये 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आले. मोदी सोमवारी उझबेकीस्तानची राजधानी असलेल्या ताशकंदला पोहोचले.
उझबेकिस्तानचे पंतप्रधान शौकत मिरोमोनोविक मिर्जीयोएव्ह यांनी एअरपोर्टवर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी औपचारिक बैठकीत चर्चाही केली. पंतप्रधान मोदींनी इंग्रजी आणि स्थानिक भाषेत ट्विट करून भव्य स्वागतासाठी पंतप्रधान शौकत मिरोमोनोविक मिर्जीयोएव्ह यांचे आभार मानले.

दौऱ्यातील कार्यक्रम
दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौऱ्यादरम्यान मोदी त्या ठिकाणच्या स्कॉलर्स आणि हिंदीच्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत. त्याशिवाय ते याठिकाणी असलेल्या भारतीय समुदायातील लोकांनाही संबोधित करणार आहेत. मोदी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांनाही श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 1966 मध्ये शास्त्री यांचा ताशकंद येथे गूढ मृत्यू झाला होता. उझबेकिस्तानमध्ये सुमारे 3,000 भारतीय आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मौदींच्या दौऱ्याचे संबंधित फोटो...