आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Visited Masdar City In UAE On Second Day Of Tour

मोदी म्हणाले, भारत- यूएईदरम्यान 700 फ्लाईट, पण लागली 34 वर्षे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरच्या स्लाइडवर... - Divya Marathi
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरच्या स्लाइडवर...
अबू धाबी - युनायटेड अरब अमिरात (UAE) दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी झिरो कार्बन सिटी मॅसडरला पोहोचले. त्यानंतर त्यांनी उद्योगपतींबरोबर चर्चा केली. दुपारी लंचनंतर ते दुबईला जातील. दुबईमध्ये मोदी 50 हजार भारतीयांच्या उपस्थितीत भाषण करतील.
फ्युचर सिटीला भेट दिल्यानंतर मॅसडरमध्ये झालेल्या इनव्हेस्टर मीटमध्ये मोदी म्हणाले की, भारत आणि यूएईदरम्यान सध्या 700 फ्लाइट्स आहेत. पण त्यासाठी आपण 34 वर्षे का वाया घालवली? याबाबत मला अत्यंत वाईट वाटत आहे. पण आता या 34 वर्षांमध्ये झालेले नुकसान मला भरून काढायचे आहे. तसे पाहता मला अडथळे वासराहक्काने मिळाले आहेत. मी त्यापासून दूर पळू शकत नाही. मी केवळ चांगले ते घ्यावे आणि वाईट ते सर्व सोडून द्यायचे असेही होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मोदींचा इशारा यूएईमध्ये 34 वर्षांनंतर झालेल्या पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे होता. मोदींच्या आधी इंदिरा गांधींनी या देशाचा दौरा केला होता. या कार्यक्रमानंतर मोदी दुबईला जाणार आहेत. त्याठिकाणी 50 हजार भारतीयांच्या उपस्थितीत मोदी भाषण करतील.
मॅसडरला म्हटले जाते, सिटी ऑफ फ्युचर
17 किमीच्या परिसरात पसरलेल्या मॅसडरला सिटी ऑफ फ्युचर असेही म्हटले जाते. सध्या हे शहर नव्या पद्धतीने डिझाइन करण्याचे काम सुरू आहे. या शहरामध्ये झिरो पोल्युशनचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे नावही झिरो कार्बन सिटी ठेवण्यात आले आहे. 2025 पर्यंत झिरो कार्बन (म्हणजे झिरो पोल्‍यूशन) चे लक्ष्य साध्य केले जाणार आहे. या शहरामध्ये पेट्रोल-डीजेलवर चालणाऱ्या गाड्यांना परवानगी नाही. शहरातील सर्व गाड्या वीज किंवा बॅटरीवर चालतात.
UPDATES...
12.50PM: दाऊदच्या प्रश्नावर बोलण्यास परराष्ट्र मंत्रालयाचा नकार. प्रवक्ते म्हणाले, पंतप्रधान आणि प्रिन्स यांच्याच अजून चर्चा व्हायची आहे. त्याआधी काहीही सांगता येणार नाही.
12.45PM: अबू धाबीमध्ये पंतप्रधान मोदी प्रिन्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर दोन्ही देश संयुक्त निवेदन सादर करतील.
12.40PM: पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद. प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, पंतप्रधानांनी यूएईच्या गुंतवणूकदारांना त्यांचे व्हिजन सांगितले. पोर्ट, कोल्ड स्टोरेजवर चर्चा झाली.
11.50AM: मॅसडरमध्ये उद्योगपतींबरोबरच्या चर्चेच मोदींचे भाषण संपले.
11.48AM: पंतप्रधान म्हणाले, आपण 34 वर्षे का वाया घालवली? याबाबत मला वाईट वाटते आहेत. 34 वर्षांत झालेल्या नुकसानाची भरपाई व्हावी, असे मला वाटते.
11.45AM: मॅसडरमध्ये इनव्हेस्टर्स मीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, भारतात एक ट्रिलियन डॉलरच्या गुंतवणुकीच्या संधी आहेत. मी तुम्हाला सर्वांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतो.
11.41AM: मोदी म्हणाले, 2020 पर्यंत 50 मिलियन लो कॉस्ट घरांची योजना. आम्हाला स्पीड, टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी पाहिजे.
11.40AM: पंतप्रधान म्हणाले, आम्ही रेल्वेमध्ये 100 % एफडीआई केले आहे. तुम्ही गुंतवणूक करा.
11.39AM: उद्योगपतींबरोबर बैठकीनंतर पंतप्रधान म्हणाले, गैरसमजामुळे अनेक बाबी रखडल्या आहेत. त्या सुरू करण्यावर जोर आहे. मी येथील वाणिज्य मंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी थेट लोकांच्या समस्या ऐकाव्यात.
11.14AM: मॅसडरमध्ये उद्योगपतींबरोबर पंतप्रधानांची बैठक सुरू.
11.00AM: काँग्रेस नेते मीम अफजल पत्रकार परिषदेत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी यूएईमधून अधिकाधिक गुंतवणूक आणण्यावर जोर द्यावा. सध्या तेथे सर्वाधिक गुंतवणूक भारतीयांची आहे.
10.52AM: मॅसडर सिटीमध्ये PM मोदींनी हिंदीमध्ये दिला डिजिटल ऑटोग्राफ. विज्ञान ही जीवन है, असा हिंदीत संदेश लिहिला.
10.50AM: मॅसडर सिटीमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये पंतप्रधानांनी केला प्रवास.
10.35AM: मोदींनी मॅसडर सिटीचा विकास आराखडा पाहिला. सिटीचा नकाशा पाहिला. 2025 पर्यंत शहर पूर्णपणे वसले जाईल.
10.15AM: यूएई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मॅसडर सिटीत पोहोचले. येथे झिरो कार्बन सिटी तयार करण्यात येणार आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS