आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInUK : लँडरोव्हरच्या प्लान्टमध्ये मोदी, आज तुर्कस्तानला जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगुआर लँडरोवर प्लान्टमध्ये पंतप्रधान मोदी. - Divya Marathi
जगुआर लँडरोवर प्लान्टमध्ये पंतप्रधान मोदी.
लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिटन दौऱ्याचा शनिवारी अखेरचा दिवस आहे. त्यानंतर मोदी जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी तुर्कस्तानची राजधानी अंकाराकडे रवाना होणार आहे. शनिवारी मोदींनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारी भारतीय कंपनी टाटा ग्रुपच्या जगवार लँडरोव्हरचा दौरा केला.
त्याआधी मोदींनी 12व्या शतकातील कन्नड संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मेमोरियलवर श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी मोदींनी वेम्ब्ली स्टेडियममध्ये 60 हजार भारतीयांच्या उपस्थित भाषण दिले. त्यांनी भारतीय समुदायासमोर मत व्यक्त केले. आम्हाला कोणाचे उपकार नको, बरोबरी हवी आहे, अशा शब्दांत मोदींनी आपले मत मांडले.

ब्रिटनमध्ये भारताची प्रतिमा Job Maker ची
- ब्रिटनमध्ये 122 फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट्स भारतातील आहेत.
- 800 लहान-मोठ्या भारतीय कंपन्या ब्रिटनमध्ये काम करत आहेत.
‌- 1.1 लाख लोकांना 13 मोठ्या भारतीय कंपन्या इंग्लंडमध्ये रोजगार उपलब्ध करून देतात.
- 65 हजार ब्रिटिश नागरिक तर केवळ टाटा ग्रुपमध्ये कामाला आहेत. त्यापैकी बहुतांश लँडरोव्हरमध्ये आहेत.

भारत-युकेसाठी दौरा महत्त्वाचा का?
- टीम मोदींनी या दौऱ्यासाठी जोरदारी तयारी केली आहे. इंग्लंडबरोबर संबंध सुधारण्याबरोबरच भारतीय समुदायावरही त्यांचे लक्ष आहे.
- ब्रिटिश मीडियानुसार इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून हेदेखिल चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या दौऱ्यापेक्षा मोदींच्या दौऱ्याला अधिक महत्त्व देत आहेत.
- 18 अब्ज डॉलरचे व्यापारी संबंध.
- 15 लाख भारतीय ब्रिटनमध्ये राहतात.

संत बसवेश्वर म्हणजे आदर्श...
महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मोदी म्हणाले की, संत बसवेश्वर हे लोकशाहीसाठी आदर्श होते. त्यांनी भारतीय समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी संसदेसारख्या व्यासपीठाची सूचना केली होती. हा पुतळा लोकशाहीवर विश्वास असलेल्यांसाठी प्रेरणा बनेल.

स्वराज पॉल यांची भेट
ब्रिटन दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मोदी ब्रिटीश संसदेमध्ये लेबर पार्टी आणि विरोधीपक्ष नेते, जेरेमी कोरबिन यांचीही भेट घेतली. त्याशिवाय ते एनआरआय उद्योगपती स्वराज पॉल यांनाही भेटले. त्यांचा मुलगा अंगद याच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी शोकही व्यक्त केला. पॉल यांचा मुलगा अंगदचा मृत्यू घराच्या आठव्या मजल्यावरून पडल्यामुळे झाला होता.