आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदाच्या व्हिडिओमध्ये प्रथमच मोदींचा उल्लेख, म्हटले इस्लामचा शत्रू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी. - Divya Marathi
अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी.
नवी दिल्ली - अल कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेने पोस्ट केलेल्या एका ताज्या व्हिडिओमध्ये प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अल कायदाची मीडिया विंग अस-शबाबने पोस्ट केला आहे.
फ्रॉम फ्रान्स टू बांगलादेश: द डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन' अशा शिर्षकाचा व्हिडिओ
2 मे रोजी पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये अल कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेचा प्रमुख आसीम उमर याचा आवाज आहे. आसिमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत म्हटले आहे की, जगभरातील मुस्लिमांच्या विरोधात युद्ध पुकारले जात आहे. आमच्या धर्माच्या विरोधात सुरू असलेले हे युद्ध वर्ल्ड बँक, आयएमएफ पॉलिसी, ड्रोन हल्ले, शार्ली हेब्दोचे कार्टून, संयुक्त राष्ट्रांची घोषणापत्रे आणि नरेंद्र मोदींचे कटू बोल या आधारे लढले जात असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. इस्लामच्या विरोधात नरेंद्र मोदींच्या रंक्तरंजित वक्तव्यांच्या आधारे युद्ध सुरू असल्याचेही म्हटले आहे.

व्हिडिओची पडताळणी सुरू
अल कायदाने 27 फेब्रुवारीला बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये जन्मलेले अमेरिकेचे ब्लॉगर अविजित रॉय यांच्यासह चार बांग्लादेशी ब्लॉगर्सची हत्या करण्याची जबाबदारीही व्हिडिओत घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे 27 फेब्रुवारीला ढाकामध्ये काही हल्लेखोरांनी चाकूहल्ला करून अविजित रॉय यांची हत्या केली होती. या हल्ल्यात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. संघटनेने बांगलादेशी ब्लॉगर्स ओयासिकर रेहमान बाबू, राजीब हैदर आणि शफिऊल इस्लाम यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. या व्हिडिओची सत्यता पडताळणी सुरू असल्याचे भारताने म्हटले आहे.

उमरने व्हिडिओत म्हटले आहे की, "इस्लामच्या विरोधात लिहिणा-यांच्या हत्येचे मिशन पाकिस्तानातून सुरू झाले होते. आम्ही धर्मनिरपेक्ष डॉक्टर शकील उज आणि ब्लॉगर अनिका नाज यांची हत्या केली, अशी कबुलीही दिली. गेल्यावर्षी अल कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याने भारतीय उपखंडात नवी शाखा सुरू करण्याची घोषणा केली होती. जवाहिरीच्या मते या शाखेने शाखा बर्मा, बांगलादेश, भारतातील ईशान्येकडील राज्ये याठिकाणी कारवायांना सुरुवात केली आहे. आसीम उमर याला या संघटनेचा म्होरक्या घोषित केले होते.
पुढील स्लाइडवर पाहा VIDEO