आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नावे हा विक्रम; नेहरू, इंदिरांसह मनमोहन सिंगांनाही टाकले मागे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन दौऱ्यातील एक क्षण... - Divya Marathi
चीन दौऱ्यातील एक क्षण...
इंटरनॅशनल डेस्क - अॅक्ट ईस्ट, लिंक वेस्ट आणि शेजारधर्म फर्स्ट असे महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय धोरण राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र दौऱ्याच्या बाबतीत नवा विक्रम स्थापित केला आहे. पंतप्रधान पदावर असताना सर्वाधिक परराष्ट्र वारी करण्याच्या बाबतीत त्यांनी पहिले पीएम पंडित जवाहरलाल नेहरूंपासून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पर्यंत सर्वांना पिछाडीवर टाकले आहे. त्यांनी आपल्या 3 वर्षांच्या कारकिर्दीत चक्क 57 देशांचे दौरे केले आहेत. 3 वर्षांतच त्यांनी 3.4 लाख किमीचा प्रवास केला. त्यांनी आपल्या परराष्ट्र दौऱ्याची सुरुवात 15 जून 2014 पासून भूटान दौरा करून केली.  
 

- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या दोन्ही कार्यकाळात सर्वाधिक परराष्ट्र दौरे केले असे म्हटले जात होते. मोदींनी मात्र, त्यांना सुद्धा पिछाडीवर टाकले आहे. 
- सिंग यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या कार्यकाळात सुरुवातीच्या 3 वर्षांत केलेल्या दौऱ्यांची तुलना मोदींनी आपल्या सुरुवातीच्या 3 वर्षांत केलेल्या दौऱ्यांची तुलना केल्यास मोदीच आघाडीवर असल्याचे दिसून येते. 
- माजी पंतप्रधान सिंग यांनी पहिल्या कार्यकाळातील सुरुवातीच्या तीन वर्षांत 27 परराष्ट्र दौरे केले होते. तर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये सिंग यांनी 36 परराष्ट्र दौरे केले होते. आतापर्यंतच्या इतिहासात तेच सर्वाधिक परराष्ट्र दौरे करणारे पंतप्रधान मानले जात होते. 
- मोदींनी आपल्या सुरुवातीच्या तीन वर्षात तब्बल 49 परराष्ट्र दौरे करून त्यांचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत या दौऱ्यांची संख्या 57 झाली आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींचे महत्वाचे परराष्ट्र दौरे आणि त्यातून काय मिळाले..?
बातम्या आणखी आहेत...